पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यानंतर आज त्यांनी पदभार स्वीकारताच पहिली सही शेतक-यांसाठी केली…


दिल्ली प्रतिनिधी :- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पंतप्रधान पदाचा पदभार स्विकारला आहे. पदभार स्विकारताच त्यांनी शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतलाय. त्यांनी किसान सन्मान निधीच्या फाईलवर स्वाक्षरी केली आहे.
यामुळे किसान सन्मान निधीचा १७ वा हफ्ता जारी झाला असून याचा ९.३ कोटी शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. यासाठी २०, ००० कोटींचा खर्च सरकारला आला आहे.

देशातील शेतकरी १७ व्या हप्त्याची वाट पाहत होते. सध्या पेरणाची दिवस सुरु आहे. त्यामुळे नव्या सरकारची स्थापना होताच. पंतप्रधान यांनी हा निर्णय घेतला. ही योजना २०१८ पासून सुरु करण्यात आली आहे. या योजनेच्या निकषांनुसार सर्व पात्र शेतकरी कुटुंबास २००० रुपये प्रती हप्ता या प्रमाणे तीन समान हप्त्यात प्रती वर्षी ६ हजार रुपये त्यांच्या आधार व डीबीटी संलग्न बँक खात्यात जमा करण्यात येते.
शात नवीन सरकार स्थापन होताच पंतप्रधान नरेंद्र मोदी कृतीत दिसले पाहिजेत. नवीन सरकार सत्तेवर येताच पहिला निर्णय घेऊन त्यांनी सरकारची शेतकरी हिताची बांधिलकी दाखविण्याचा प्रयत्न केला आहे.

Advertisement

पंतप्रधान मोदी यांनी फाईलवर स्वाक्षरी केल्यानंतर म्हटलं की, ‘आम्ही शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी प्रतिबद्ध आहोत.आम्ही शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी जास्तीत जास्त काम करणार आहोत. यासाठीच आमचे सरकार आतापर्यंत काम करत आले आहे आणि पुढेही काम करत राहील.’ किसान सन्मान निधीचा १६ वा हफ्ता फेब्रुवारीमध्ये जारी करण्यात आला होता. त्यानंतर आज सतरावा हफ्ता जारी करण्यात आला.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!