सद्गुरु शंकर महाराजांची आरती करून या भाजप गुंडाना सद्बुद्धी दे अशी प्रार्थना शिवसेना (उबाठा )कडून करण्यात आली …


पुणे प्रतिनिधी :- मिलिंद राजहंस

सदगुरु शंकर महाराज मठात काल झालेल्या भाजपा दोन गटात तुंबळ हाणामारी मुळे शिवसेना (उबाठा )च्या वतीने सद्गुरु शंकर महाराज मठा समोर आंदोलन करण्यात आले...

धनकवडी परिसरात सद्गुरु शंकर महाराज मठात केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ दर्शनासाठी आल्यानंतर गाभाऱ्यात जाण्यावरून भारतीय जनता पार्टीच्या दोन गटात तुंबळ हाणामारी झाली घडलेल्या घटनेचे व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित झाल्यानंतर मंदिरातील हाणामारीचा विषय पुणेकरांनी चांगला जिव्हारी लागला होता. दरम्यान घडलेल्या प्रकारावर भाविकांकडून नाराजी व्यक्त करण्यात आली तसेच नागरिकांकडून भीतीचे वातावरण निर्माण झाले व या ठिकाणी मंदिराचे पावित्र्य भंग झाला असल्याच्या भावना भाविकांमध्ये आहे.

Advertisement

परिस्थितीचे गांभीर्य जाणून व भाविकांमध्ये असलेला रोष निर्माण झाल्यामुळे आज शिवसेना ( उबाठा ) या पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने जमा झाले माजी नगरसेवक बाळा ओसवाल यांच्या नेतृत्वात शंकर महाराज मंदिरा समोर निषेध आंदोलन करून सद्गुरु शंकर महाराजांची आरती करून या भाजप गुंडाना सद्बुद्धी दे अश्या गुंडांपासून भक्तांचे रक्षण अशी प्रार्थना व याचना नगरसेवक बाळा ओसवाल, सूरज लोखंडे ,सचिन जोगदंड ,दिलीप पोमण ,आदी कार्यकर्ते यांच्या कडून करण्यात आली..


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!