पुणे महानगरपालिकेचा आपत्ती व्यवस्थापन कक्ष कार्यान्वित …
पुणे प्रतिनिधी :- मिलिंद राजहंस
पुणे मनपाचे सर्व खाते/विभाग, उप आयुक्त कार्यालय (परिमंडळ १ ते ४), तसेच महापालिका सहा. आयुक्त, क्षेत्रीय कार्यालय ,आरोग्य विभाग, आदी कार्यालय (24/7 )कार्यालय चालू असणार आहेत.
सार्वजनिक बांधकाम विभाग, पोलिस, अग्निशमन दल, जिल्हा प्रशासन, विभागीय आयुक्त कार्यालय, पाटबंधारे विभाग, हवामानशास्त्र विभाग असे इतर विभागांशी समन्वय ठेवण्यात येतो. पुणे शहरात आपत्ती जनक परिस्थिती उद्भवल्यास पुणे महानगरपालिकेचे अधिकारी 24 तास उपलब्ध असणार असल्याचे गणेश सोनुने यांनी सांगितले.
पावसाळ्याचे दिवस असल्याने पुणे शहरात कोणतीही आपत्ती जनक घटना घडू नये. शहरात अनेक जुने वाडे जीर्ण अवस्तेत आहेत. नदी ओढे यांना मोठया प्रमाणात पूर येत असतो. असे अपघात दर वेळी घडतात व घटना घडू नये यासाठी पुणे महानगरपालिकेने आपत्ती व्यवस्थापन कक्ष कार्यान्वित केला आहे. शहरात अप्रीय घटना घडू नये महापालिकेने अधिकारी
१) ०२०-२५५०१२६९
२) ०२०-६७८०१५००
३) ०२०-२५५०६८००
खाते प्रमुखाचे नाव: श्री गणेश सोनुने
पदनाम: आपत्ती व्यवस्थापन अधिकारी
ई-मेल आयडी: ganesh.sonune@punecorporation.org
मोबाइल क्रमांक: +91 9689931511
तरी वर नमूद केलेले संपर्क क्रमांक आपत्कालीन परिस्थितीमध्ये नागरिकांचे संपर्काकरिता आहेत. पुणे महानगर पालिका ने प्रसिद्ध केले आहेत …



