पुणे शहरात क्रूर पणे महिलेचे शीर, हातपाय धडा पासून वेगळे करून हत्या करणाऱ्या पतिपत्नीस अटक…
पुणे प्रतिनिधी :- मिलिंद राजहंस
घराच्या मालकीवरुन महिलेचे शीर, हातपाय धडा पासून वेगळे करून क्रूर पणे हत्या करणाऱ्या पतिपत्नीला अटक करून माणुसकीला काळिमा फासणाऱ्या घटनेची पुणे शहरात पोलिसांकडून उकल करण्यात आली या बाबत पोलीस आयुक्त यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली…

पोलिसांनी दिलेल्या माहिती अनुसार दि.२६/०८/२०२४ रोजी साधारणतः दुपारी ११.०५ वा चे सुमारास एक स्त्री जातीची मयत बॉडी स.नं.७०/१, जेनी लाईट कन्स्ट्रक्शनचे मागे, वॉटर फ्रंट सोसायटी जवळ, खराडी पुणे चे पाठीमागे मुळा मुठा नदीचे पात्रामध्ये मिळुन आली होती. सदर अनोळखी मयत महिला वय अंदाजे ३० ते ६० वर्षे, नाव पत्ता माहिती नाही हिचे मयत बॉडीचे धडापासुनचे शिर, दोन्ही हात खांदया पासुन, दोन्ही पाय खुब्यापासुन नव्हते. त्यामुळे तिस अज्ञात ठिकाणी अज्ञात इसमाने जीवे ठार मारुन, पुरावा नष्ट करण्याचे उद्देशाने मयत बॉडीचे धडापासुनचे शिर, दोन्ही हात खांदया पासुन हात. दोन्ही पाय खुब्यापासुन कोणत्यातरी धारधार हत्याराने कापुन, धड कोठेतरी मुळा मुठा नदीपात्रात टाकुन दिल्याने पोलीस हवालदार/५२२ पवार यांनी दिले फिर्यादीवरुन अज्ञात इसमाविरुध्द चंदननगर पोलीस स्टेशन गु.रजि. नं.४४५/२०२४, बीएनएस कलम १०३, २३८ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे.
तपास पथकाचे अधिकारी व अंमलदार, तसेच युनिट ४. गुन्हे शाखा, पुणे शहर यांचेकडील अधिकारी व अंमलदार हे करीत होते. सदर तपासा दरम्यान दि.०१/०८/२०२४ पासुन पुणे शहरात तसेच पिंपरी चिचवड हद्दीत दाखल ३० ते ६० वर्षे वयोगटातील महिला मनुष्य मिसिंगचा तपास करण्यात येत होता. सदर गुन्ह्याचे संदर्भाने एकुण २०० मनुष्य मिसिंगचा आढावा घेण्यात आला. तसेच नदीपात्रात सदर मयत बॉडीचे इतर अवशेष यांचाही पाणबुडी, तसेच ड्रोन कॅमेरेव्दारा शोध घेण्यात येत होता.
सदर गुन्ह्याचा तपास करीत असताना, गुप्त बातमीदारा कडुन माहिती मिळाली की, शिवाजीनगर भागातील १ महिला मिसिंग आहे. त्याची सखोल चौकशी करुन, त्याचे नातेवाईक यांचा शोध घेऊन, दि.३०/०८/२०२४ रोजी शिवाजीनगर पोलीस स्टेशन येथे सकीना अब्दुल खान, वय-४८ वर्षे हि भैय्यावाडी, दळवी हॉस्पीटल शेजारी, नरवीर तानाजी वाडी, शिवाजीनगर पुणे येथुन दि.२३/०८/२०२४ रोजी पासुन मिसिंग झालेबाबत, मनुष्य मिसिंग तक्रार दाखल करुन घेतली. सदर मिसिंगचे अनुषंगाने चंदननगर पोलीस स्टेशनकडील तपास पथकाचे अधिकारी व अंमलदार यांनी तांत्रिक विश्लेषण व सीसीटिव्ही चे आधारे तपास करुन सदर मयत महिलेचा भाऊ अश्पाक अब्दुल खान, वय-५१ वर्षे रा.सदर यास व युनिट ४, गुन्हे शाखा, पुणे शहर यांचेकडील अधिकारी व अंमलदार यांनी हनीदा अश्पाक खान, वय-४५ वर्षे, रा. सदर यांना ताब्यात घेण्यात आले होते. सदर ताब्यात घेण्यात आलेले पती पत्नी यांचेकडे तपास करता त्यांनी सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिल्याने त्यांना सदर गुन्ह्यात अटक करण्यात आलेले आहे. आरोपी अश्पाक अब्दुल खान याने राहते घराचे मालकीवरुन घरात वारंवार होणारे वाद याचा राग मनात धरुन त्याने व त्याची पत्नी हमीदा असे मिळुन
मयत सकीना खान हिस वायरने गळा आवळुन खुन करुन, तीच्या प्रेताचे तुकडे केल्याचे कबुल केले आहे
सदर गुन्ह्याचा तपास श्री. अमितेश कुमार, पोलीस आयुक्त, पुणे शहर, श्री. रंजन कुमार शर्मा, पोलीस सह आयुक्त, पुणे शहर, श्री. मनोज पाटील, अपर पोलीस आयुक्त, पुणे शहर, श्री. शैलेश बलकवडे, अपर पोलीस आयुक्त, गुन्हे शाखा, पुणे शहर, श्री. निखिल पिंगळे, पोलीस उप आयुक्त, गुन्हे शाखा, पुणे शहर, श्री. हिम्मत जाधव, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-४ पुणे शहर, श्रीमती प्रांजली सोनवणे, सहा पोलीस आयुक्त, येरवडा विभाग, पुणे शहर यांचे मार्गदर्शनाखाली श्री. संजय चव्हाण, – वरिष्ठ पोलीस निरीक्षक, चंदननगर पोलीस स्टेशन, पुणे, श्री. अनिल गाने, पोलीस निरीक्षक, (गुन्हे), चंदननगर पोलीस स्टेशन, पुणे, श्री अजय वाघमारे , पोलीस निरीक्षक, शिवाजीनगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. चंद्रशेखर सावंत, यांचे दिमतीत सहा पोलीस निरी, दत्तात्रय लिगाडे, सिद्धनाथ खांडेकर, पो.उप निरी राहुल कोळपे, अश्विनी पाटील, पोलीस अंमलदार विनोद तांदळे, रामचंद्र गुरव, महेश नानेकर, सचिन रणदिवे, विश्वनाथ गोणे, सचिन घोलप, नानासाहेब पतुरे, शिवाजी धांडे, प्रफुल्ल मोरे, शेखर शिंदे, श्रीकांत कोद्रे, सुरज जाधव, विकास कदम, नामदेव गडदरे, अमोल जाधव, सचिन पाटील, संदीप गायकवाड तसेच युनिट ४, गुन्हे शाखा, पुणे यांचेकडील अंमलदार यांनी केलेली आहे.



