लग्नाचे आमिष दाखवून डॉक्टर तरुणीस आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या डॉक्टरला बिबवेवाडी पोलीसांनी नवी मुंबई येथून केली अटक….


पुणे प्रतिनिधी :- मिलिंद राजहंस

दहा लाख रुपये उकळल्यानंतरही लग्नास नकार दिल्याच्या कारणातून डॉक्टर तरुणीने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली. हा धक्कादायक प्रकार बिबवेवाडी परिसरातील एका क्लिनिकमध्ये ७ जानेवारी रोजी घडला. याप्रकरणी आता बिबवेवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिक माहिती अशी की, डॉक्टर कुलदिप आदिनाथ सावंत वय-३० वर्षे रा.५२१७, वॉर्ड क्र.०६, उमराणी रोड, शंकर कॉलनी जत ता.जत जि.सांगली सद्या रा. पुणे याने त्याचे पुर्वी लग्न झालेले असताना देखील जीवनसाथी डॉटकॉम या संकेतस्थळावर आपण अविवाहीत असल्याचे नमुद करुन लग्नासाठी नोंदणी केली. सदरची नोंदणी पाहून, फिर्यादी हे त्यांना स्वतः जावून भेटले असता, त्याचे वागणे व त्याचे दवाखाना त्यांना योग्य वाटले नाही म्हणून त्यास नकार कळविला. त्यानंतर देखील त्याने फिर्यादी यांची मुलगी पल्लवी पोपट फडतरे हिस मोबाईलवर परस्पर संपर्क केला. तिचेशी मैत्री करुन, तो अविवाहित असल्याचे तिस भासवून तिचेसोबत लग्न करण्याचे आमिष दाखवून मुलीकडून १० लाख रुपयांहून अधिकची रक्कम घेवुन ती माघारी परत केली नाही त्यामुळे फिर्यादी यांची मुलगी डॉ. पल्लवी पोपट फडतरे हिस मानसिक धक्का बसून, मानसिक त्रास देवून तिला आत्महत्येस प्रवृत्त केले आहे म्हणुन फिर्यादी यांनी कुलदिप आदिनाथ सावंत याचेविरुद्ध तक्रार दिलेने बिबवेवाडी पोलीस स्टेशन गुन्हा रजि.नं. १५/२०२५ भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १०८ प्रमाणे गुन्हा दाखल आहे.

Advertisement

दाखल गुन्हयातील आरोपी कुलदिप सावंत याचा मा. पोलीस उप आयुक्त डॉ. राजकुमार शिंदे, मा. सहा.पो.आयुक्त धन्यकुमार गोडेस, मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर साळुंखे यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हयाचे तपास अधिकारी पोलीस उप निरीक्षक शशांक जाधव यांना त्यांचे गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या बातमीवरून व तांत्रिक तपासावरून नमुद आरोपी हा नवीमुंबई येथे येणार असल्याची माहिती प्राप्त झालेने त्याचा शोध घेणेकामी पोलीस उप निरीक्षक शशांक जाधव, सहा. पोलीस फौजदार सोमनाथ सुतार, पोलीस अमंलदार सुमित ताकपेरे व अजय कामठे यांची टिम तयार करून रवाना केले असता नमुद टिम दोन दिवस नवीमुंबई तळ ठोकून आरोपी नामे कुलदिप आदिनाथ सावंत वय-३० वर्षे रा.५२१७, वॉर्ड क्र.०६, उमराणी रोड, शंकर कॉलनी जत ता.जत जि. सांगली यास दिघा नवीमुंबई येथून ताब्यात घेवून दिनांक २४/०१/२०२५ रोजी गुन्हयात अटक करण्यात आली आहे. दाखल गुन्हयाचा पुढील तपास पोलीस उप निरीक्षक शशांक जाधव हे करीत आहेत.

सदरची कामगिरी मा. पोलीस आयुक्त श्री अमितेशकुमार, मा. सह पोलीस आयुक्त श्री रंजनकुमार शर्मा, मा. अप्पर पोलीस आयुक्त श्री मनोज पाटील, मा. पोलीस उप आयुक्त डॉ. राजकुमार शिंदे, परिमंडळ ५ पुणे शहर, मा. सहा. पोलीस आयुक्त श्री धन्यकुमार गोडसे, वानवडी विभाग पुणे शहर यांचे मार्गदर्शनाखाली, वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री शंकर साळुंखे, तपास अधिकारी पोलीस उप निरीक्षक शशांक जाधव, सहा. पोलीस फौजदार सोमनाथ सुतार, पोलीस हवालदार निलेश खोमणे, पोलीस अमंलदार सुमित ताकपेरे, अजय कामठे, विशाल जाधव, ज्योतिष काळे, आशिष गायकवाड, शिवाजी येवले व प्रणय पाटील यांनी केली आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!