पुणे मनपा व सायकल क्लबच्या सहकार्याने १५ ऑगस्ट २०२४ रोजी भव्य सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले …


पुणे प्रतिनिधी :- मिलिंद राजहंस

पुणे महानगरपालिकेच्या क्रीडा विभागाच्या वतीने व पुणे महानगरपालिका सायकल क्लबचे सहकार्याने १५ ऑगस्ट २०२४ रोजी हर घर तिरंगा भव्य सायकल रॅली आयोजन सकाळी ८.२० वाजता मनपा मुख्य भवन येथून आयोजित करण्यात आले आहे.सदर रॅलीला झेंडा दाखवून मा. डॉ. राजेंद्र भोसले, महापालिका आयुक्त तथा प्रशासक पुणे महानगरपालिका यांचे शुभहस्ते झाले आहे.

हर घर तिरंगा उपक्रमांतर्गत भारताच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त गुरुवार दि. १५ ऑगस्ट २०२४ रोजी पुणे मनपा क्रीडा विभागाने पुणे मनपा सायकल क्लबच्या सहकार्याने भव्य सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले
रॅलीमार्ग : मनपा भवन मॉडर्न कॅफे जंगली महाराज रोड वरून अलका टॉकीज चौक टिळक रोड Study कॉलेज बाजीराव रोड- मनपा भवन समारोप करण्यात आला. सदर
रॅलीमध्ये १८ ते ६० वयोगटातील सर्व स्त्री , पुरुषास सहभाग घेतला असून अंदाजे १५०० ते २००० सायकलस्वार सहभागी झाले होते पुणे महानगरपालिका चे असंख्य अधिकारी मोठया प्रमाणात रॅली मधे सहभागी झाले.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!