पुणे शहर पोलीस दलात उल्लेखनीय सेवेबद्दल सहाय्यक पोलीस आयुक्त, श्री सतिश रघुवीर गोवेकर, यांना सन २०२४ चा राष्ट्रपती पदक जाहीर….


पुणे प्रतिनिधी :- मिलिंद राजहंस

पुणे शहर पोलीस आयुक्तालयाचे आस्थापनावरील मा. सहाय्यक पोलीस आयुक्त, गुन्हे ०२, गुन्हे शाखा, पुणे शहर श्री. सतिश रघुवीर गोवेकर, यांना सन २०२४ च्या स्वातंत्रदिनी दि.१५/०८/२०२४ रोजी राष्ट्रपतींचे उल्लेखनीय सेवेबद्दल पोलीस पदक घोषीत झालेले आहे.

श्री सतिश गोवेकर हे १९८८ बॅचचे पोलीस अधिकारी आहेत. १९८८ मध्ये पोलीस उपनिरीक्षक या पदावर त्यांची सरळसेवेतून नियुक्ती झालेली आहे. त्यानंतर सन २००७ मध्ये त्यांची पोलीस निरीक्षक पदावर पदोन्नती झाल्यानंतर त्यांनी पुणे शहर येथे गुन्हे शाखा, दत्तवाडी पोलीस स्टेशन, कोंढवा पोलीस स्टेशन या ठिकाणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून उत्तमप्रकारे कर्तव्य बजाविले आहे. त्यानंतर त्यांनी गुन्हे शाखा मुंबई शहर, स्थानिक गुन्हे शाखा, नागपुर ग्रामीण व कामठी पोलीस स्टेशन, नागपुर ग्रामीण या ठिकाणी कर्तव्य बजाविलेले आहेत.

• त्यानंतर सन २०१७ मध्ये त्यांची सहा. पोलीस आयुक्त या पदावर पदोन्नती झाल्यानंतर त्यांनी प्रथम राज्य गुन्हे

Advertisement

अन्वेषण विभाग, नवी मुंबई तसेच पुणे शहर येथे फरासखाना विभाग व सध्या गुन्हे शाखा येथे कर्तव्य बजावित आहेत.

त्यांची एकूण सेवा कालावधी ही ३६ वर्ष पुर्ण झालेली असून, ते दिनांक ३१/०८/२०२४ रोजी सेवानिवृत्त होत आहेत. त्यांनी आतापर्यंतच्या सेवा कालावधीमध्ये मुंबई शहर, नवी मुंबई, नागपुर ग्रामीण, गुन्हे अन्वेषण विभाग व पुणे शहर येथे कर्तव्य बजाविले आहेत.

त्यांच्या सेवा कालावधीमध्ये त्यांना एकूण ५०३ बक्षिसे मिळालेले आहेत. तसेच त्यांनी त्यांच्या सेवा कालावधीमध्ये अतिशय किचकट, संवेदनशिल व क्लिष्ट गुन्हे उघडकीस आणण्यामध्ये यश मिळविलेले आहे.

त्यांना दिनांक १५/०४/२००८ रोजी मा. पोलीस महासंचालक पदक देवून सन्मानित करण्यात आले आहे. त्यांना दिनांक २६/०१/२०११ रोजी गुणवंतापुर्ण सेवेसाठी पोलीस पदक देवून त्यांचा सन्मान केलेला आहे. व त्यांना आता वैशिष्टयपुर्ण सेवा व उल्लेखनिय कामगीरीबद्दल राष्ट्रपती पदकाने सन्मानित करण्यात आले आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!