MESB टॉवरवर चढून तार चोरी करत असताना खाली पडला, उपचारकामी हॉस्पीटलमध्ये भारती न करता मित्रानीच जिवंत पुरला…
पुणे प्रतिनिधी :- मिलिंद राजहंस
सिंहगड पोलिस स्टेशन येथे बेपत्ता नोंद असलेल्या व्यक्तीचा मृत्यू झाल्याचे उघड झाले आहे. बेपत्ता व्यक्तीला त्याच्याच मित्रांनी जिवंत पुरल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. या प्रकरणी सिंहगड पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. सिंहगड पोलिसांनी मंगळवारी ही माहिती दिली.
सिंहगड रोड पोलीस स्टेशन, पुणे शहर मनुष्य मिसींग मधील मिसींग व्यक्ती नामे बसवराज मंगळुरे वय २२ वर्ष रा. वडगाव बु.पुणे मुळ गाव सोलापुर याचे तपासामध्ये बसवराज मंगळुरे हा त्याचा मित्र सौरभ रेणुसे याचे सोबत दि.१२/०७/२०२४ रोजी भात लावणीसाठी पाबे गावी गेला होता. दि.१३/०७/२०२४ रोजी बसवराज मंगळुरे हा त्याचे मित्र सौरभ रेणुसे व रुपेश येणपुरे यांचेसोबत मु.पो. रांजणे ता. वेल्हा, जि. पुणे याठिकाणी टॉवरवर चढुन तार एक्सा ब्लेडने कापत असताना तार तुटुन बसवराज मंगळुरे हा टॉवर वरुन खाली जमिनीवर पडला. सौरभ रेणुसे, रुपेश येणपुरे यांनी बसवराज यास उपचारकामी हॉस्पीटलमध्ये न नेता पाबे घाटाजवळील जमिनीत खड्डा करुन पुरले अशी माहीती प्राप्त झाली.
प्राप्त माहीतीच्या अनुषंगाने सिंहगड रोड पोलीस ठाणे कडील पोउपनि निंबाळकर, पोउपनि भांडवलकर, पोउपनि जायभाय, व इतर पोलीस स्टाफ यांनी रुपेश येणपुरे, सौरभ रेणुसे यांचेसह मु.पो.पाबे, ता. वेल्हा, जि. पुणे याठिकाणी जावुन स्थानिक पोलीसांची मदत घेवुन, निवासी नायब तहसीलदार, ता. वेल्हा जि.पुणे यांचे समक्ष सौरभ रेणुसे याने दाखविलेल्या ठिकाणाची जमीन उकरली असता, सदर ठिकाणी बसवराज मंगळुरे हा गाडलेल्या अवस्थेत मिळुन आला.
बसवराज मंगळुरे यास सौरभ रेणुसे याने भात लावणीसाठी गावी नेवुन, नंतर मिसींग व्यक्ती बसवराज मंगळुरे, याचे सह सौरभ रेणुसे, रुपेश येणपुरे असे मु.पो रांजणे, ता. वेल्हा, जि.पुणे येथे एमएसईबीचे टॉवरची तार चोरणेसाठी गेले असताना, सौरभ रेणुसे, रुपेश येणपुरे यांनी बसवराज मंगळुरे यास टॉवरवर तार कापण्यासाठी पाठविले असता, बसवराज मंगळुरे हा टॉवरवरुन खाली पडला. त्यावेळी त्यास सौरभ रेणुसे, रुपेश येणपुरे यांनी उपचारकामी हॉस्पीटलमध्ये न नेता, पाबे घाटातील जंगलात खड्डा करुन पुरलेबाबत निष्पन्न झाले.
सदर घटनेबाबत मयत इसम बसवराज मंगळुरे याची आई यांनी आरोपी नामे १. रुपेश अरुण येनपुरे, वय २५ वर्ष रा.मु.पो. पाबे, ता. वेल्हा, जि. पुणे २) सौरभ बापू रेणुसे, वय २५ वर्ष, रा.मु.पो. पाबे, विठ्ठलवाडी ता. वेल्हा, जि. पुणे यांचेविरुध्द दिले तक्रारी वरुन सिंहगड रोड पोलीस स्टेशन पुणे शहर गुन्हा रजिस्टर क्रमांक ००/२०२४ भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १०५,२३८.३०३(२).६२.३ (५) प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला. सदरचा प्रकार वेल्हा पोलीस स्टेशन ह्रदीत घडला असल्याने, गुन्हा पुढील तपासकामी वेल्हा पोलीस स्टेशन, पुणे ग्रामीण यांचेकडे पाठविण्यात आला आहे. पुढील तपास वेल्हा पोलीस स्टेशन करीत आहे.
सदरची कामगिरी मा. पोलीस उपआयुक्त परीमंडळ ३. श्री. संभाजी कदम, मा. सहा पोलीस आयुक्त, सिंहगडरोड विभाग श्री. अजय परमार, वरीष्ठ पोलीस निरीक्षक, सिंहगड पो. स्टेशन श्री. आनंदराव खोबरे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री. राघवेंद्र क्षीरसागर, यांचे मार्गदर्शनाखाली सहा पोलीस निरीक्षक सचिन निकम, पोलीस उप निरीक्षक संतोष भांडवलकर, सुरेश जायभाय, निकेतन निंबाळकर, पोलीस अंमलदार, सतिश नागुल, सुहास गायकवाड, सचिन गायकवाड, नवनाथ वणवे, शिवाजी क्षिरसागर, राजाभाऊ वेगरे, उत्तम तारु, यांचे पथकाने केली.



