पूणे शहर, पिंपरी चिंचवड शहरासह ग्रामीण भागातील १२ वी पर्यंतच्या शाळांना ही सुट्टी आहे…
पुणे प्रतिनिधी :- मिलिंद राजहंस
प्रादेशिक हवामान केंद्राने जिल्ह्यात ९ जुलै रोजी अति मुसळधार पावसाचा इशारा दिला असल्याने जिल्ह्यातील १२ वी पर्यंतच्या सर्व शाळांना ९ जुलै रोजी सुट्टी जाहीर करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी पत्रकाद्वारे सांगितले ..
अतिवृष्टीमुळे कोणत्याही प्रकारची अनूचित घटना घडू नये तसेच आपत्कालीन परिस्थिती निर्माण होऊन त्याचा परिणाम शालेय विद्यार्थ्यांवर होवू नये याकरीता जिल्ह्यातील १२ वी पर्यंतच्या सर्व शाळांना मंगळवारी सुट्टी राहील.
या कालावधीत सर्व मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी कार्यालयीन वेळेत शाळेत उपस्थित राहून स्थानिक प्रशासनाच्या आदेशानुसार आपत्ती व्यवस्थापनाचे कामकाज करावे असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.
राज्यात आठ जुलैला एका दिवसात सरासरी ११.३ मिलिमीटर पाऊस पडतो. सोमवारी (ता. ८) एका दिवसांत २४.१ मिलिमीटर पावसाची नोंद झाल्याची माहिती हवामान खात्याने दिली.
गेल्या ४८ तासांपासून संपूर्ण राज्यभरात मुसळधार पाऊस कोसळत आहेत. त्यामुळे नद्या-नाले तुडूंब भरून वाहत आहेत.
गेल्या ४८ तासांपासून संपूर्ण राज्यभरात मुसळधार पाऊस कोसळत आहेत. त्यामुळे नद्या-नाले तुडूंब भरून वाहत आहेत.



