” ससून हॉस्पिटल कॅम्पस मध्ये नशिली पदार्थांची विक्री..


पुणे प्रतिनिधी :- मिलिंद राजहंस

पुणे जिल्ह्यातील ससून सर्वोउपचार रुग्णालय मधे चार महिन्या पासून येरवडा कारागृहातील गुन्हेगार पोसणे ,ड्रग्ज रॅकेट प्रकरणात गुन्हेगार फरार कारणे ,पोर्स कार अपघात प्रकरणातील अल्पवयीन मुलाचे ब्लड सॅम्पल बदलणे अश्या अनेक संवेदनशील प्रकरणात ससून प्रशासन भ्रष्टचारात गुंतले..

ससून रुग्णालय कॅम्पस मधे नवीन बिल्डिंग डेड हाऊस येथे अनधिकृत पत्राशेड मधे गुटखा ,सिगारेट ,दारू ,सर्रास सिक्युरिटी गार्डच्या देखरेखेत विकली जात आहे सिक्युरिटी गार्डच्या डोळ्या देखत तंबाकू जन्य पदार्थ विक्री होत असताना ससून प्रशासनाचे प्रशासकीय अधिकारी डॉ यल्लापा जाधव हे या सर्व प्रकाराला खत पाणी घालत आहेत असे दिसून आले आहे .तसेच संबंधित अधिकारी यांचे आर्थिक लागेबांधे असल्याचा दाट संशय येत आहे.संबंधित डॉ यल्लपा जाधव यांना भेटले असता त्यांनी ही बाब संवेदनशील नसून संबंधित विक्रेता याला बोलावून घेण्यात येईल अशी उडवाउडवी ची उत्तरे दिली.

Advertisement

ससून रुग्णालय डेड हाऊस व शेजारील इमारत ही नुकतीच बांधून तयार करण्यात आली आहे.
याच ठिकाणी ससून रुग्णालयात 9 फेब्रुवारी 2024 रोजी आगीची घटना घडली होती तरी प्रशासनाकडून या ठिकाणी सिगरेट तंबाकू अशाप्रकारे विकण्याची परवानगी दिली जाते ही खूप मोठी गंभीर बाब असून प्रशासन काय कारवाई करते याकडे लक्ष लागले आहे संबंधित डॉ यल्लाप्पा जाधव यांच्या वरती काय कारवाई करणार हे पाहावे लागेल

डेड हाऊस व शेजारील इमारत ही नुकतीच बांधून तयार करण्यात आली आहे या ठिकाणी शेजारी एक पत्रा शेड असून या शेड मधे सिगारेट ,गुटखा ,विक्री होत असताना ग्राहक जागृती न्यूज प्रतिनिधी यांनी सिगारेट घेतली. ज्या ठिकाणी रुग्णावर उपचार होत आहेत त्याठिकाणी नशेली पदार्थ विक्री होत असल्याने गंभीर बाब आहे


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!