सार्वजनिक धान्य वितरण व्यवस्थेचा भोंगळ कारभार विरोधात रास्त रेशन दुकानदारांनी केले ठिय्या आंदोलन ….
पुणे प्रतिनिधी :- मिलिंद राजहंस
अखिल महाराष्ट्र राज्य रास्त धान्य दुकानदार महासंघ व पुणे शहर स्वस्त दुकानदार महासंघ वतीने अन्न वितरण पुरवठा अधिकारी सेंट्रल बिल्डिंग समोर आंदोलन करण्यात आले दुकानदाराचे साडेतीन कोटी रुपये कमिशनचे रखडले असून ते त्वरित द्यावे ,तसेच कमिशन प्रति किलो 50 पैसे वाढवून मिळावे अश्या विविध मागण्या निवेदनात करण्यात आल्या..
दर महिन्याला रेशन दुकानदार रेशन वाटपात 100% लक्ष पूर्ण करण्याचे उद्दिष्ट रेशन दुकानदारांकडून देण्यात येते मात्र याच दुकानदारांचे गेल्या तीन महिन्यापासून धान्य वाटपाचे कमिशन तब्बल साडेतीन कोटी रुपयांचे कमिशन थकीत आहे. याबाबत रेशन दुकानदारांनी सेंट्रल बिल्डिंगच्या गेट समोर आंदोलन करण्यात आले
सार्वजनिक अन्नधान्य वितरण व्यवस्थेकडून नागरिकांना राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेतून धान्य पुरवठा केला जात आहे या योजनेतून रेशन दुकानदारांना दीड रुपये प्रति क्विंटल असे कमिशन देण्यात येते त्यामुळे कमिशन साठी रेशन दुकानदारांना चार ते पाच महिने वाट पाहत लागते त्यानंतर अजूनही कमिशनची वाट पाहत लागत आहे. कमिशनची रक्कम तब्बल साडेतीन कोटी रुपये थकीत असल्याने रेशन दुकानदार संघटनेचे अध्यक्ष गणेश डांगी यांनी सांगितले संघटनेच्या मागण्या प्रति किलो 50 पैसे कमिशन वाढ करावी वाहतूक हमाली संयुक्त संयुक्त बैठका मार्जिन मनीचे पैसे त्वरित व वेळेवर मिळावे तसेच केवायसी आधी मागण्यासाठी रेशन दुकानदारांनी आंदोलन केले..
आदोलनात संघटनेचे अध्यक्ष, गणेश डांगी, सतिश पवार, अमित बिर्ला, आशा कांबळे, हिंगणेताई, मालन रणधीर, चित्ते सुलोचना, बंडीवारकाका,राऊतशेठ,कर्नावटभाऊ,रामलाल डांगी ,संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते



