33 वर्षांचा झंझावात संपला! पुणे शहर अभियंता प्रशांत वाघमारे सेवानिवृत्त..
पुणे प्रतिनिधी :- मिलिंद राजहंस
पुणे महानगरपालिकेचे शहर अभियंता प्रशांत वाघमारे हे तब्बल 33 वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर आज सेवेतून निवृत्त झाले. त्यांच्या निवृत्तीच्या निमित्ताने महापालिकेत अधिकारी-कर्मचाऱ्यांची मोठी गर्दी उसळली होती.
प्रशासनात कडक शिस्त, वचक आणि निर्णयक्षम नेतृत्व यासाठी ओळखले जाणारे प्रशांत वाघमारे हे असे अधिकारी होते की प्रशासनात वचक होताच, पण नगरसेवकही त्यांना घाबरत!
महापालिकेत असा वजनदार अधिकारी पुन्हा तयार होईल का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा ‘गेमचेंजर’ अधिकारी प्रशांत वाघमारे यांनी महापालिकेत आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत बांधकाम विभागासह विविध विभागांची कामे ऑनलाइन पद्धतीने सुरू करून पारदर्शकता आणि गतीमानता वाढवली.
त्यांच्या कार्यकुशल नेतृत्वामुळे पुणे महापालिका ई-गव्हर्नन्समध्ये देशपातळीवर अग्रक्रमी राहिली.
22+ वर्ष शहर अभियंता पदावर ‘विक्रम’
प्रशांत वाघमारे यांनी पुणे महापालिकेत उपअभियंता पदावर 1993 मध्ये रुजू होऊन आपल्या कामाचा ठसा उमटवला.
विशेष म्हणजे त्यांनी 22 वर्षांहून अधिक काळ शहर अभियंता पदावर कार्यरत राहण्याचा विक्रम केला आहे.
या कालावधीत शहरातील अनेक महत्त्वाचे प्रकल्प आणि योजना पूर्णत्वास नेण्यात त्यांचे मोठे योगदान राहिले आहे.
शिक्षण आणि कारकीर्द
🔹 सीईओपी महाविद्यालयातून अभियांत्रिकी शिक्षण
🔹 1990 : महाराष्ट्र जीवन प्राधिकरणमध्ये नोकरीची सुरुवात
🔹 1993 : पुणे महापालिकेत उपअभियंता म्हणून रुजू
🔹 पथ विभागानंतर भवन रचना विभागात महत्त्वाची जबाबदारी
निरोपासाठी अधिकारी-कर्मचाऱ्यांची गर्दी
त्यांच्या सेवामुक्तीच्या निमित्ताने महापालिकेत मोठ्या संख्येने अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
वाघमारे यांना निरोप देताना अनेकांनी “प्रशासनाचा कणा निवृत्त झाला” अशा भावना व्यक्त केल्या.




Turn your audience into earnings—become an affiliate partner today!