उपमुख्यमंत्री मा. अजित अनंतराव पवार यांचे दुःखद निधन; पुणे महापालिकेची कार्यालये आज बंद”
पुणे प्रतिनिधी :- गणेश तुम्मा
राज्य शासनाच्या आदेशानुसार मा. उपमुख्यमंत्री महोदय यांच्या दुःखद निधनामुळे पुणे महानगरपालिकेची सर्व शासकीय कार्यालये (अत्यावश्यक सेवा वगळून) आज दि. २८/०१/२०२६ रोजी पूर्ण दिवस बंद ठेवण्यात येत आहेत. तसेच राज्य शासनाकडून प्राप्त झालेल्या आदेशानुसार दि. २८/०१/२०२६ ते दि. ३०/०१/२०२६ या कालावधीत पुणे महानगरपालिका कार्यक्षेत्रात शासकीय दुखवटा पाळण्यात येणार आहे.
महाराष्ट्र राज्यासाठी अत्यंत दुःखद आणि धक्कादायक घटना समोर आली आहे.
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा. अजित आशाताई अनंतराव पवार यांचे आज दि. २८/०१/२०२६ रोजी दुःखद निधन झाल्याची माहिती प्राप्त झाली आहे. या दुःखद बातमीने राज्यभर शोककळा पसरली असून सर्व स्तरातून हळहळ व्यक्त होत आहे.
Advertisement
या कालावधीत महापालिकेतील सर्व कार्यालयांचे शासकीय कामकाज नियमित सुरू राहणार आहे, मात्र कोणतेही शासकीय कार्यक्रम आयोजित करण्यात येणार नाहीत, याची नागरिकांनी नोंद घ्यावी, असे संबंधित प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आले आहे.



