पुणे झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प (SRA)चा अंदाधुंद कारभार तब्ब्ल 22 अनधिकृत सदनिका लाटल्याचा आरोप…
पुणे प्रतिनिधी :- मिलिंद राजहंस
आण्णाभाऊ साठे वसाहत भवानी पेठ झोपडपट्टी पुनर्वसन योजना (SRA) चे अधिकारी ,स्थानिक पुढारी ,आणि विकासक जावेद पठाण यांची मिलीभगत 55 झोपड्या असताना 77 झोपड्या दाखवून लाखो रुपये चा मलिदा लाटला…

झोपडपट्टी पुनर्वसन म्हणजे विकसक, स्थानिक राजकीय पुढारी व शासकीय अधिकारी यांच्या साठी आपले स्वतःचे उखळ पांढरे करून हाच उद्देश असतो. खरं पाहता झोपडपट्टी पुनर्वसन योजना ही गरीब झोपडीधारकाला स्वतःचे असे पक्कं घर देणे व त्यातून त्याचे जीवनमान उंचावण्यासाठी प्रयत्न करणं हा असताना विकसक हा स्वतःच्या फायद्यासाठी स्थानिक गुंडांना हाताशी धरून बेकायदेशीरपणे काम करत आहेत.
अण्णा भाऊ साठे वसाहत भवानी पेठ येथील झोपडपट्टीची संख्या ५५ असताना विकसक व शासकीय अधिकारी यांनी अफरातफर करून ती संख्या ७७ वर नेली व शासनाची फसवणूक केली तसेच जे झोपडपट्टी धारक नाहीत त्यांना देखील घरं मंजूर केलीत, हा सगळा प्रकार विकसक, स्थानिक राजकीय पुढारी, शासकीय अधिकारी व गुंड यांनी संगनमताने केला आहे,

रिपब्लिकन बहुजन आघाडीने प्रस्तुत प्रकरणात लक्ष केंद्रित केले असून त्याविरोधात आंदोलन सुरू करण्यात येणार आहे. त्याचाच भाग म्हणून आज दिनांक २१/०६/२०२४ रोजी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण पुणे पिंपरी चिंचवड क्षेत्र पुणे यांचे कार्यालय येथे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना तक्रारी अर्ज दिला असून दोन तीन दिवसात सदर प्रकरणाची चौकशी करून कारवाई केली नाही तर त्याविरोधात मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्यात येईल.
सदरील निवेदन संघटनेचे महाराष्ट्र अध्यक्ष किशोर कांबळे, महासचिव ऍड.आकाश साबळे, पुणे शहर अध्यक्ष सागर डावरे यांच्या नेतृत्वाखाली अण्णा भाऊ साठे वसाहत येथील झोपडपट्टी धारकांच्या उपस्थिती मध्ये देण्यात आले.



