अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या मध्यस्थीने भारत-पाक युद्धविराम….
प्रतिनिधी नवी दिल्ली :- मोठी बातमी
संध्याकाळी 5 वाजल्या पासून भारत पाकिस्तान मध्ये शस्त्रसंधी लागू केली आहे.भारत-पाकिस्तान संघर्ष टिपेला पोहोचलेला असताना दोन्ही देशांकडून तात्काळ युद्धविराम लागू करण्याचा निर्णय घेतला आहे….
भारत-पाकिस्तान संघर्ष टिपेला पोहोचलेला असताना दोन्ही देशांकडून तात्काळ युद्धविराम लागू करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली आहे.आमच्या दीर्घ चर्चेनंतर दोन्ही देशांनी हा निर्णय घेतला असल्याचं ट्विट ट्रम्प यांनी केलं आहे. तसंच यासाठी दोन्ही देशांचं त्यांनी अभिनंदनही केलं आहे. पण भारताकडून अद्याप यावर अधिकृतरित्या कुठलंही भाष्य करण्यात आलेलं नाही.
Advertisement
भारताच्या भूमीवर कुठल्याही प्रकारे दहशतवादी हल्ला झाल्यास हे युद्ध समजण्यात येईल या अटी वर युद्ध विराम करण्यात येईल असे पत्रकार परीषदेत घोषणा करण्यात आली…



