पुणे शहर पोलीस आयुक्त यांच्या आदेशाने शहरातील सर्व पोलीस स्टेशन मधे दर शनिवारी तक्रार निवारण दिनाचे आयोजन….
पुणे प्रतिनिधी :- मिलिंद राजहंस
पुणे शहर पोलीस आयुक्त कार्यालयात तसेच पोलीस स्टेशन मधे अनेक तक्रारी अर्ज दाखल होत असतात. त्या तक्रारी अर्जाची दखल अनेक वेळा घेतली जात नाही. असा समज सामान्य नागरिकांचा होतो. तसेच अनेक अर्ज वर्षानुवर्षे पेंडिंग असतात राज्य शासनाने नागरिकांसाठी तक्रार निवारण दिन ठरवून प्रशासनाने तक्रारीची दाखल घ्यावी व नागरिकांचे प्रश्न तक्रारी योग्य वेळी तात्काळ निवारण केले जावे. त्याचं अनुषंगाणे मा पोलीस आयुक्तांनी दर शनिवारी तक्रार निवारण दिन घ्यावा असे आदेश दिले आहेत.
मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर यांनी त्यांचे अधिपत्याखालील प्रादेशिक अपर पोलीस आयुक्त, परिमंडळीय पोलीस उप आयुक्त, विभागीय सहाय्यक पोलीस आयुक्त व पोलीस स्टेशन कडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना त्यांचे अधिपत्याखालील पोलीस स्टेशनला दर शनिवारी हद्दीतील नागरीकांच्या समस्या/तक्रारी निवारण करणेसाठी “तक्रार निवारण दिन” आयोजित करणेबाबत आदेशीत केले आहे.
त्याप्रमाणे येत्या शनिवार दिनांक १५/०२/२०२५ रोजी सकाळी १०.३० ते १३.३० या कालावधीत खालील नमुद तक्त्यामध्ये दर्शविलेल्या पोलीस स्टेशनला स्वतः पोलीस उप आयुक्त व सहाय्यक पोलीस आयुक्त हे स्वतः हजर राहून त्या त्या पोलीस स्टेशन हद्दीतील नागरीकांच्या तक्रारी ऐकूण त्यांचे निवारण करतील.

ज्या पोलीस स्टेशनला सहाय्यक पोलीस आयुक्त किंवा पोलीस निराक्षक हे तक्रार निवारण दिनाची प्रक्रिया पूर्ण करतील. पोलीस उप आयुक्त नसतील त्या ठिकाणी वरिष्ठ
नागरीकांना अवाहन करण्यात येते कि त्यांनी पोलीस स्टेशन येथे आपले तक्रार अर्ज प्रलंबित असल्यास उपस्थित रहावे.



