मार्केटयार्ड आंबेडकर नगर झोपडपट्टी मधे धोकादायक पद्धतीने बेकायदेशीरपणे गॅस रिफिलिंग….


पुणे प्रतिनिधी :- मिलिंद राजहंस

मार्केटयार्ड आंबेडकर नगर झोपडपट्टी परिसरात दाटीवाटीने झोपड्या आहेत. अनधिकृत,बेकायदेशीर पणे गॅस रिफिलिंग कारणे किती धोकादायक असु शकते, अनधिकृत गॅस रिफीलिंग करणारे बेधडक छोट्या गॅस सिलेंडर मधे भरला जात आहे याला गॅस कंपन्या मूक संमती देत आहेत का असा प्रश्न स्थानिक नागरिकांन मधून विचारला जाऊ लागला आहे. संबंधित गॅस हा भारत गॅस कंपनी चा दिसून येतो संबंधित गॅस वितरकावर कारवाई होणार का हे पाहावे लागेल…

मार्केटयार्ड पोलीस स्टेशन अंतर्गत असणाऱ्या आंबेडकर नगर झोपडपट्टी मधे गोपनीय बातमीदारा मार्फत माहिती मिळाली की आंबेडकर नगर येथील गल्ली नंबर 4 येथे अवैधरीत्या व बेकायदेशीरपणे गॅस रिफिलिंग करून मिळतो. अशी बातमी मिळताच आम्ही स्वतः व आमच्या पोलीस स्टेशन अधिकारी अंमलदार व दोन पंचासह आंबेडकर नगर येथे गेलो असता गल्ली नंबर 4 येथील दावल एंटरप्राइजेस या दुकानांमध्ये बेकायदेशीरपणे घरगुती वापराचे मोठ्या गॅस सिलेंडर मधून लहान गॅस सिलेंडर मध्ये निष्काळजी पणे,गॅस रिफिलिंग करून देण्याचे काम बेकायदेशीर पणे चालू होते. सदर ठिकाणची अधिक पाहणी केली असता त्या ठिकाणी गॅस रिफिलिंग साठी लागणारे सर्व सामान आम्हास मिळून आले. सदर कार्यवाहीचा पंचा समक्ष पंचनामा करण्यात आलेला असून BNS कलम 287,288 सह जीवनावश्यक वस्तू कायदा कलम 1955 कलम 3 व 7 अन्वये गु. रजि.नंबर 20 / 25गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्ह्यात आरोपीत बंदी नवाज उर्फ सलीम गुलाब शेरीकर वय 35 राहणार आंबेडकर गल्ली नंबर 4 दावल मिनी स्टोअर मार्केट यार्ड पुणे यास ताब्यात घेण्यात आले आहे.

Advertisement

ग्राहक हक्क संघर्ष समितीचे पुणे शहर अध्यक्ष दत्ता साबळे म्हणाले या परिसरात अवैद्य गॅस रिफिलिंग गेली अनेक वर्ष चालू असून गॅस कंपन्या अश्या लोकांना दोन, तीन कार्ड कशे देतात संबंधित गॅस एजन्सी वर कारवाई झाली पाहिजे…


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!