पुणे शहरतील पाच पोलीस ठाण्यातील वॉन्टेड ,तडीपार आरोपी. शिवा माने याची बिबवेवाडी पोलिसांनी काढली वरात…


पुणे प्रतिनिधी :- मिलिंद राजहंस

बिबवेवाडी पोलीस ठाणे गुन्हा रजि.नं. ३२१/२०२४ भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १०९,११८ (२),१८९ (२) १९०.१९१(२),१९१ (३), महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चेकलम ३७ (१) सह १३५,१४२ अन्वये दाखल असून यातील फिर्यादी यांना दि.१४.१२.२०२४ रोजी पहाटे ०३.३० वा. चे सुमारास पवन नगर भाग-०१, अप्पर बिबवेवाडी पुणे व सोळा एकर मैदान सुप्पर बिबवेवाडी पुणे येथे फिर्यादी व त्यांचा मामा प्रसाद जाधव यांना जनावरे चारण्यासाठी आलेचे संशयावरुन लोखंडी रॉड, लाकडी बांबु व लाथाबुक्यांनी मारहाण करुन फिर्यादी यांचे डोक्यात, दोन्ही पायावर, हातावर जबर जखमी करून उजवे पायास फ्रैक्चर व नाकास फ्रैक्चर केले आहे. तसेच प्रसाद प्रकाश जाधव यांचे डोक्यात, हातावर, छातीवर, पायावर मारुन जबर जखमी केले म्हणून फिर्यादी यांनी शिवा ऊर्फ शिवम गणेश माने, सद्दाम चमनुर शेख, सिंग नावाचा इसम व त्यांचे दोन व तीन साथीदार यांचे विरुध्द तक्रार दिली आहे. तसेच सदर गुन्ह्यातील तडीपार आरोपी शिवा ऊर्फ शिवम गणेश माने हा बिबवेवाडी पोलीस ठाणे व खालील पोलीस ठाणे येथे पाहीजे आरोपी होता.

Advertisement

सिंहगड रोड पोलीस ठाणे, शिरवळ पोलीस ठाणे, स्वारगेट पोलीस ठाणे,भोर पोलीस ठाणे इतर अनेक पोलीस स्टेशन पाहिजे असलेला आरोपी शिवा माने वरील पोलीस ठाणे येथून फरार असलेला व आपली ओळख लपवून गुन्हे करत असलेल्या तडीपार आरोपीस वर नमुद पोलीस ठाणेकडील तपास पथके व बिबवेवाडी पोलीस ठाणे कडील तपास पथक कसून शोध घेत होते. आरोपी हा अतिषय चालाक व रेकॉर्डवरील असल्याने तो पोलीसांचे डावपेच ओळखून होता. सदर आरोपीवर वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात लहान मुलींना छेडणे,जबरी चोरीचे. पिस्तोल हत्यार बाळगणे. गुन्हे हाफ मर्डर असे अनेक गुन्हे दाखल होते. मिळून येत नसल्याने बिबवेवाडी पोलीस तपास पथक यांनी त्यास ताब्यात घेऊन त्याची वरात काढली आहे.

सदर आरोपी बाबत अधिक माहिती काढली असता आरोपी हा त्याची मैत्रीनिकडे मध्यरात्री भेटण्याकरीता येणार असल्याची गोपनियम माहिती पोलीस उपनिरीक्षक अशोक येवले, पोशि १००१९ ताकपेरे, पोशि १०४४२ गायकवाड, पोशि २२९० पाटील, पोशि २२१२ काळे यांना मिळाल्याने सदर ठिकाणी अनेक दिवस पाळत ठेवून तसा सापळा रचून आरोपी हा त्याच्या मैत्रीनिकडे शिवतेज नगर येथे मध्यरात्री येताच त्यास पोलीसांनी घेरल्याची चाहूल लागल्याने तो पळून जात असताना शिताफितीने ताब्यात घेण्यात आले आहे. सदर आरोपीस ०५ दिवसाची पोलीस कस्टडी घेण्यात आली आहे.

दाखल गुन्हयातील पाहीजे आरोपीचा वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर साळुंखे व पोलीस निरीक्षक गुन्हे सुरज बेंद्रे, यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक श्री अशोक येवले यांनी तपास पथकातील अमंलदार यांनी कामगिरी केली 


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!