पुणे शहरातील प्रमुख गुटखा तस्कर निजामुद्दीन शेख,व प्रकाश भाटी टोळी पोलिसांच्या जाळ्यात…
पुणे प्रतिनिधी :- मिलिंद राजहंस…
पुणे शहर व परिसरात मोठ्या प्रमाणत गुटखा विक्री चे जाळे निजामुद्दीन शेख,व प्रकाश भाटी या टोळी ने निर्माण केले आहे. या टोळीवर शहरातील विविध पोलीस स्टेशन मधे गुन्हे दाखल असून. शहरातील कोंढवा,बिबवेवाडी येवलेवाडी, वडाचीवाडी, हडफसर, विविध उपनगरातील पोलीस स्टेशन हद्दीत गुटख्याचे गोडाऊन जाळे निर्माण केले असल्याचे समजते. या गुटखा तस्कर टोळीचे अनेक छोटे मोठे दलाल शहरात गुटखा विक्री करण्यात कार्यरत आहेत. असे असताना गुटखा तस्करीत फरार असलेल्या प्रकाश भाटी गुन्हे शाखेच्या युनिट 2 कारवाई करून जेरबंद केले…
गुटखा तस्करी प्रकरणात फरार असलेल्या एकाला गुन्हे शाखेच्या युनिट २ ने ताब्यात घेतले. फेब्रुवारी महिन्यात काळेपडळ पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यात हा फरार होता. प्रकाश भाटी (वय ४०) असे ताब्यात घेतलेल्या गुटखा तस्कराचे नाव असून, पुढील तपासासाठी त्याला काळेपडळ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. संबंधित प्रकरणात संपत राज, सुरेशकुमार पेमाराम भाटी, भवर भाटी, निजामुद्दीन शेख, गुप्ता (पूर्ण नाव नाही), संदीप ढाका, आशू ऊर्फ शिवप्रकाश गुप्ता यांच्याविरुद्ध काळेपडळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.
१७ फेब्रुवारीमध्ये पथकाला गुटख्याचा साठा असलेल्या गोदामाची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने उंड्री परिसरातील वडाचीवाडीत छापा टाकला. त्यावेळी गोदामात ११ लाख ५६ हजारांचा गुटखा मिळून आला. तसेच, तीन वाहनांत मिळून ६४ लाख ४४ हजारांचा गुटखा पथकाने जप्त केला होता. संबंधित गुन्ह्यातील आरोपी संपत राज याच्यासह भाटी, शेख, गुप्ता, ढाका यांनी संगनमताने गुटख्याच्या विक्रीचा डाव रचल्याचे दिसून आले. गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी पसार झाले होते. त्यातील आरोपी निजामुद्दीन शेख याला नुकतेच राजगड पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर खडक, काळेपडळ पोलिसांनी वर्ग करून घेत तपास केला आहे….
पुणे शहरात व महाराष्ट्रात गुटखा बंदी असताना सर्रास पणे छोट्या पान दुकानात गुटखा विक्री होताना दिसते लहान मुले, तरुण या गुटख्याच्या आहारी गेला आहे कॅन्सर सारख्या महा भयंकर रोग होतोय हे माहित असताना नागरिक गुटखा खातायत व प्रकाश भाटी व निजामुद्दीन शेख यांच्या सारख्या टोळ्या थोडयाशा नफ्या साठी विक्री करत आहेत. कोंढवा पोलीस स्टेशन अंतर्गत आमच्या संघटनेने गुटखा विक्री विरोधात अनेक तक्रारी दाखल करून ही या सारखे गुन्हेगार सुटतात.ग्राहक हक्क संघर्ष समितीचे कारकर्ते अमोल सूर्यवंशी यांनी सांगितले



