जमिनीच्या वादातुन तरुणाचा खुन करुन पसार झालेल्या आरोपींना सोलापूर येथून 24 तासात केली अटक…


पुणे प्रतिनिधी :- मिलिंद राजहंस

आंबेगाव पोलीस स्टेशन अंतर्गत कात्रज येथील जमिनीच्या वादातुन दि.२०/०४/२०२५ रोजी पहाटे ०३/४५ वा.चे सुमा.साईछत्र अपार्टमेन्टच्या पाठीमागील जागी, ओमसाई मित्र मंडळा शेजारी, कात्रज पुणे येथे एका तरुणाचा निर्घुण पणे खुन केलेबाबत आंबेगाव पोलीस स्टेशन माहिती मिळाली असता घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी सोलापूर कामती खुाा ता मोहोळ परिसरातून 24 तासात आरोपीना अटक केली..

सदर गुन्हयाचे तपासात सदरचा गुन्हा करणारे आरोपी निष्पण करुन गोपनिय बातमीच्या आधारे सदरचे आरोपीत हे मु. कामती खुाा ता मोहोळ येथे असल्याबाबत माहिती प्राप्त झाल्याने पोलीस उप निरीक्षक मोहन कळमकर पोलीस अंमलदार हणमंत मासाळ, धनाजी धोत्रे, नितीन कातुर्डे असे मोहोळ येथे जावुन मिळालेल्या माहितीच्या आधारे तसेच तांत्रीक विश्लेषण करुन गुन्हयातील आरोपी हे मंगळवेढा ते सोलापुर हायवे रोडवर, समाधान हॉटेल समोर, मु. कामती खुगा, ता. मोहोळ येथे मिळुन आल्याने त्यांना सदर गुन्हयात ताब्यात घेवुन त्यांचेकडे तपास करता त्यांचा गुन्हयातील सहभाग निष्पन्न झाल्याने त्यांना सदर गुन्हयात अटक करण्यात आली असुन सदर गुन्हयाचा अधिक तपास सहा. पोलीस निरीक्षक स्वाती देवधर ह्या करत आहेत

Advertisement

अटक करण्यात आलेल्या आरोपी 4 असून सदर आंबेगाव पोलिसांनी दाखल गु.र.नं.६६/२०२५ भा.न्या.सं. कलम १०३,३ (५), ११५(२), ३५१ (२), ३५२ प्रमाणे गुन्हा दाखल आहे.

सदर अटक केलेल्या आरोपीची नावे खालील प्रमाणे

१) अमर दिलीप साकोरे वय-४० वर्षे रा. संतोषनगर, कात्रज पुणे २) मंदार मारुती किवळे वय-३५ वर्षे रा. नवीन वसाहत, कात्रज पुणे ३) गिरीष सुभाष बाबरे वय-२६ वर्षे रा संतोषनगर, कात्रज पुणे. ४) योगेश बाबुराव डोरे वय ३५ वर्षे रा. खोपडेनगर कात्रज पुणे.

सदरची कारवाई मा. अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशीक विभाग पुणे श्री. प्रविणकुमार पाटील, मा. पोलीस उपआयुक्त परि.२ श्रीमती स्मार्तना पाटील, मा. सहा. पोलीस आयुक्त, स्वारगेट विभाग श्री. राहुल आवारे यांचे मार्गदर्शनाखाली आंबेगाव पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. शरद झिने, सहा. पोलीस निरीक्षक स्वाती देवधर, भोजलींग दोडमीसे, पोलीस उप निरीक्षक मोहन कळमकर, राजेंद्र वंजारी, पोलीस अंमलदार राजेश गोसावी, हणमंत मासाळ, गणेश दुधाने, प्रसाद टापरे, चेतन गोरे, निलेश जमदाडे, अवधुत जमदाडे, धनाजी धोत्रे, प्रमोद भोसले, सुभाष मोरे, नितीन कातुर्डे, योगेश जगदाळे, हरीश गायकवाड,, आदिनाथ देवकर, प्रकाश विटेकर यांच्या पथकाने केली.

 


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!