सन 2024 -2025 या वर्षाकरिता ‘आरटीई’ 25 टक्के प्रवेश प्रक्रिये सुरु …


पुणे प्रतिनिधी :- शैक्षणिक वर्ष 2024-2025 साठी ‘शिक्षण हक्क अधिनियम’ अर्थात ‘आरटीई’ अंतर्गत 25 टक्के (RTE)आरक्षित जागांसाठीच्या सुधारित ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेस शुक्रवार 17 मे 2024 पासून प्रारंभ झाला आहे.
‘आरटीई’ अंतर्गत ऑनलाईन प्रवेशाची अंतिम मुदत शुक्रवार, 31 मे 2024 पर्यंत असणार आहे.

आरटीई अंतर्गत दुर्बल, वंचित, शैक्षणिक व सामाजिकदृष्ट्या मागासवर्ग घटकांकरिता विद्यार्थ्याच्या घरापासून 1 किलोमीटर अंतरावरील खासगी शाळेत 25 टक्के आरक्षित कोट्यातून विनामूल्य प्रवेश दिले जातात. त्यानुसार, मुंबईतील 319 पात्र शाळांमधील आरटीईच्या 25 टक्के मोफत प्रवेशासाठी  महाराष्ट्र शासनाच्या https://student.maharashtra.gov.in/adm_portal (www नाही) या संकेत स्थळावरून ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरता येतील.

Advertisement

यापूर्वी सन 2024 -2025 या वर्षाकरिता ‘आरटीई’ 25 टक्के प्रवेश प्रक्रियेसाठी बालकांच्या पालकांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले होते. तथापि, माननीय उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, ही प्रक्रिया स्थगित करण्यात आली. त्यामुळे यापूर्वी ऑनलाईन पद्धतीने अर्ज केला असला तरी बालकांच्या पालकांनी नव्याने प्रवेश अर्ज करणे बंधनकारक आहे. गेल्या काही दिवसांपासून शिक्षण हक्क कायद्या अंतर्गत (आरटीई) देण्यात येणारी प्रवेश प्रक्रिया रखडली होती. परंतु आता ही प्रक्रिया सुरू झाली आहे.

आरटीच्या प्रवेश प्रक्रिये बाबत मार्गदर्शक सूचना प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी प्रसिद्ध केल्या आहेत प्राथमिक शिक्षण संचालका संचालनालय तर्फ आर्थिक दुर्बल वंचित व आर्थिक मागास घटकातील बालकांना अर्थ स्वयं अर्थ सहाय्यता शाळा विनाअनुदानित शाळा पोलीस कल्याणकारी शाळा विनाअनुवळ व महापालिकेच्या शाळा मधे या स्तरावर 25 टक्के राखीव शाळांसाठी प्रवेश प्रक्रिया राबवली जाणार आहे. आरतीसाठी तब्बल 12000 अर्ज पालकांनी आपल्या मुलांचे अर्ज भरण्याचे स्पष्ट झाले आहे


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!