दारु पिण्यास १०० रूपये मागितल्याच्या कारणावरून खून करून पसार झालेल्या आरोपीस हडपसर पोलिसांकडून अटक…
पुणे प्रतिनिधी :- मयत इसम राजेंद्र रामभाऊ शेजुळ, व आरोपी राजेश सोनकर हे एकत्र दारू पिण्यासाठी बसले होते,हांडेवाडी सय्यदनगर रोड याठिकाणी पीओपीचे काम करणारा इसम राजेश सोनकर याचे व मयत इसमासोबत दारु पिण्याचे कारणावरुन भांडण झाले,१०० रूपये मागीतलेचे कारणावरून राजेश सोनकर यास शिवीगाळ करून हाताने मारहाण केल्याने रागाचे भरात मयत इसम यास लाकडी बांबुने डोक्यावर व अंगावर मारहाण केल्याचे सांगितले. मारहाणी मध्ये मयत इसम हा गंभीर जखमी झाला होता त्यातच त्याचा मृत्यू झाला होता
दिनांक १२/०५/२०२४ रोजी हांडेवाडी सय्यद नगर रोडच्या बाजुला, मोकळ्या जागेत अनोळखी इसमाचा मृतदेह मिळून आल्याने त्याअनुषंगाने हडपसर पोलीस स्टेशन येथे अकस्मात मयत रजि नंबर- २०२/२०२४ सीआरपीसी १७४ प्रमाणे दाखल करण्यात आले. त्यावरून मा. वैद्यकीय अधिकारी ससुन हॉस्पीटल पुणे यांनी दि. १३/०४/२०२४ रोजी पोस्टमार्टम केले असता त्यात मयत इसमास कोणत्यातरी हत्याराने डोक्यात व शरिरावर मारहाण झाल्याने त्यास मरण आल्याचे निष्पन्न झाले.
दाखल गुन्ह्याचे गांभिर्य ओळखून वरिष्ठ पोलीस निरीक्षक हडपसर पोलीस स्टेशन पुणे श्री. संतोष पांढरे, यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे व सुचनांप्रमाणे तपासपथक अधिकारी अर्जुन कुदळे, सहा पोलीस निरीक्षक, महेश कवळे, पोलीस उप निरीक्षक तसेच तपास पथक अंमलदार यांनी मिळून तपासाचे नियोजन केले. मयताची ओळख पटवण्याचे उद्दीष्ठ समोर ठेवून घटनास्थळाच्या जवळील भाग, हांडेवाडी, सातवनगर, सय्यदनगर, उंड्री, कडनगर अशा भागात फिरून माहीती घेत असताना, मयत इसम हा अमृतसरी तडका, कडनगर येथे हेल्पर म्हणून काम करीत असल्याचे निष्पन्न झाले. त्याआधारे मयत इसमाचे नाव राजेंद्र रामभाऊ शेजुळ, वय ३५ वर्षे रा. कडवस्ती, कोढवा पुणे असे असल्याचे निष्पन्न झाले. त्यावरून त्याचे नातेवाईकांचा शोध घेवून मयत इसमाची पत्नी श्रीमती भाग्यश्री राजेंद्र शेजुळ, रा कडनगर चौक, कोढवा पुणे. (मुळगांव बुलढाणा) यांनी दिलेल्या तक्रारीवरून हडपसर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
मयत राजेंद्र रामभाऊ शेजुळ, वय ३५ वर्षे रा. कडवस्ती, कोढ़वा पुणे याचे बाबत त्याचे नातेवाईकांकडून माहीती घेतली असता, मयतास दारूचे व्यसन असलेबाबबत माहीती मिळाली. तसेच गुन्ह्याचे घटनास्थळ परीसरात मोकळ्या जागी दारु पिण्यासाठी दारुडे लोक बसत असल्याची माहीती मिळाली. त्यावरुन पाहीजे आरोपीचा शोध तपास पथकाचे प्रमुख सपोनि अर्जुन कुदळे व पोउपनिरी महेश कवळे व तपास पथकातील अंमलदार असे घेत असताना, बातमीदारा मार्फत माहीती मिळाली की, घटनास्थळ परीसरात उमाकांत इन्क्लेव्ह, सिंपली सिटी समोर, हांडेवाडी सय्यदनगर रोड याठिकाणी पीओपीचे काम करणारा इसम राजेश सोनकर याचे व मयत इसमासोबत दारु पिण्याचे कारणावरुन भांडण झाले असल्याची खात्रीलायक बातमी मिळाली.
त्यावरुन राजेश सोनकर याचा कात्रज परीसरात शोध घेताना तो मिळून आल्याने त्यास ताब्यात घेऊन पोलीस ठाणेस आणण्यात आले. त्याचेकडे त्याचे नाव पत्ता विचारले असता राजेश सिताराम सोनकर, वय २५ वर्षे, रा. माऊलीनगर, कात्रज, पुणे मुळगाव मथुरा विलासपुर, पोलीस ठाणे गौराचौराह, जि. बलमरापुर, उत्तरप्रदेश असे सांगितले. राजेश सोनकर याचेकडे गुन्हयाचे अनुषंगाने तपास केला असता, दि.११/०५/२०२४ रोजी मयत राजु याचे सोबत दारु पित असताना राजु याने १०० रूपये मागीतलेचे कारणावरून राजेश सोनकर यास शिवीगाळ करून हाताने मारहाण केल्याने रागाचे भरात मयत राजु यास लाकडी बांबुने डोक्यावर व अंगावर मारहाण केल्याचे सांगितले.
सदरची कामगिरी ही मा. पोलीस उप आयुक्त परिमंडळ ५ श्री.आर राजा, यांचे मागदर्शनाखाली मा. सहा. पोलीस आयुक्त, हडपसर विभाग पुणे. श्रीमती अश्विनी राख हडपसर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. संतोष पांढरे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्रीमती मंगल मोढवे, पोलीस निरीक्षक (गुन्हे), श्री. उमेश गित्ते, यांचे सुचनाप्रमाणे तपास पथकाचे सहा. पोलीस निरीक्षक अर्जुन कुदळे, पोलीस उप निरीक्षक महेश कवळे, पोलीस अंमलदार, सुशील लोणकर, संदीप राठोड, समीर पांडुळे, सचिन जाधव, प्रशांत दुधाळ, निखील पवार, प्रशांत टोणपे, भगवान हंबर्डे, अजित मदने, अमोल दणके, चंद्रकांत रेजीतवाड, सचिन गोरखे, अमित साखरे, कुंडलीक केसकर, रामदास जाधव, अनिरूध्द सोनवणे, अमोल जाधव यांचे पथकाने केली आहे.



