आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी भाजपाच्या माजी नागरसेवकांसह कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल…


पुणे प्रतिनिधी :- आचारसंहिता काळात सहकार नगर पोलीस ठाण्यात बेकायदा जमा जमवून आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी भारतीय जनता पार्टी दोन नगरसेवक व 25 कार्यकर्त्यांवर सहकारनगर पोलीस स्टेशन पोलीस स्टेशन मधे गुन्हा दाखल करण्यात आला..

Advertisement

महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर आणि कार्यकर्त्यांनी पद्मावती परिसरात पैसे वाटपाचे आरोप केल्याने सहकार नगर पोलीस ठाण्यास आवारात रविवारी 12 मे रोजी ही आंदोलन केले होते. भाजप कार्यकर्त्यांनी पैसे वाटप केल्याचा आरोप त्यांनी केला होता .त्यानंतर भारतीय जनता पार्टीचे माजी नगरसेवक राजेंद्र शिळीमकर महेश वाबळे यांच्यासह 25 कार्यकर्त्यांवर सहकार नगर पोलीस ठाणे परिसरात बेकायदा जमा जमवून घोषणाबाजी केल्याने पोलिसांकडून . गुन्हा दाखल करण्यात आला. या बाबत पोलीस शिपाई अभिजीत वालगुडे यांनी सहकार नगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे…


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!