पुणे शहरातील सार्वजनिक गणेशोत्सव २०२५ शांततेत व सुरळीत पार पडावा यासाठी पोलीस प्रशासनाने कसली कंबर…..


पुणे प्रतिनिधी :- मिलिंद राजहंस, गणेश तुम्मा

पुणे शहरातील सार्वजनिक गणेशोत्सव २०२५ शांततेत व सुरळीत पार पडावा यासाठी पोलीस प्रशासनाने कंबर कसली आहे. पोलीस आयुक्त श्री. अमितेश कुमार यांनी शनिवारी सार्वजनिक गणेशोत्सवाच्या तयारीचा सविस्तर आढावा घेतला. तसेच परिमंडळ ५ चे उपायुक्त श्री. राजकुमार शिंदे यांनी वाहतूक नियंत्रण, गर्दी व्यवस्थापन, आपत्कालीन परिस्थिती हाताळणी तसेच आपत्ती व्यवस्थापन याबाबत नियोजन सादर केले. त्याचबरोबर नागरिक व मंडळांनी सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले.

पुणे शहर पोलीसांतर्फे गणेश उत्सव २०२५ दरम्यान गणेश मंडळात येणा-या गणेश भाविकांच्या सुरक्षेकरीता व पोलीस बंदोबस्त यांचे चांगले नियोजन करीता यावे यासाठी मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर श्री. अमितेश कुमार, मा. पोलीस सह आयुक्त, पुणे शहर श्री. रंजनकुमार शर्मा यांनी स्वतः इतर पोलीस अधिक-यांसोबत पायी फिरून शहरातील मध्यभागातील मानाच्या व महत्वाच्या तसेच मध्या भागातील गणेश मंडळांना भेट दिली व गणेश मंडळांचे मंडप, वाहतुक आणि बंदोबस्त याची पाहणी केली.

गणेशोत्सव काळात कायदा व सुव्यवस्था अबाधीत रहावी, गणेशोत्सव शांततेत पार पडावा याकरीता गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, यांना मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर यांनी गणेशोत्सव साजरा करणे बाबत मार्गदर्शनपर सुचना दिल्या. पोलीस अधिका-यांना गर्दी व वाहतुकीच्या नियोजनाबाबत सुचना दिल्या. तसेच गणेश मंडळांना भेटी देऊन गणेश उत्सव २०२५ च्या पूर्वतयारीचा आढावा घेतला.

Advertisement

उपायुक्त परिमंडळ ५ चे श्री राजकुमार शिंदे यांच्या वतीने नियोजन व आपत्ती व्यवस्थापन या विषयावर दिनांक २३/०८/२०२५ रोजी ११/०० वा. जांभूळकर गार्डन, वानवडी, पुणे येथे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते.
पुणे शहर गणेशोत्सवाच्या अनुषंगाने गर्दी नियोजन व आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षणाचे आयोजन केले. दिनांक २७/०८/२०२५ ते ०६/०९/२०२५ रोजीचे दरम्यान आगामी गणेशोत्सव सर्वत्र साजरा होणार आहे. गणेशोत्सव काळामध्ये होणाया गर्दीचे व्यवस्थापन व नियोजन करण्यासाठी पुणे शहरातील पोलीस अधिकारी, पोलीस अंमलदार, स्वयंसेवक व गणेश मंडळांचे कार्यकर्ते नागरिक यांचे प्रशिक्षण घेण्याबाबत पोलीस आयुक्त यांचे आदेश प्राप्त झाले होते. त्या अनुषंगाने परिमंडळ ५ कार्यक्षेत्रामध्ये गणेशोत्सव बंदोबस्त सुरळीत पार पाडण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले

सदर प्रशिक्षक रिसीलेंट इंडिया, नाशिक, जिल्हा नाशिक श्री. राजीव चौबे, यांनी यापूर्वी आषाढी व

कार्तिकी एकादशी निमित्त पंढरपूर येथील गर्दीचे तसेच नाशिक येथील कुंभमेळ्यातील गर्दीचे प्रशिक्षण

पोलीसांना दिलेले आहे. परिमंडळ ५ मधील १०० पोलीस अधिकारी, ५०० पोलीस अंमलदार, ४०० स्वयंसेवक व

गणेश मंडळांचे कार्यकर्ते नागरिक यांना गर्दी नियोजन व आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण देण्यात आले.

सदर प्रशिक्षणा दरम्यान मा. पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ५ डॉ. राजकुमार शिंदे यांनी उपस्थितांना कोणत्याही स्वरुपाच्या गर्दीचे व्यवस्थापन करत असताना लोकांचा जाण्याचा व येण्याचा मार्ग वेगळा असला पाहिजे, कुठेही क्रॉसफ्लो होवु नये पोलीसांनी दिलेल्या सुचनाचे तंतोतंत पालन केले पाहिजे, गणेश मंडळांकडे गर्दी नियंत्रणासाठी रस्सी, बॅरिकेड व स्वयंसेवक असले पाहिजेत, असे आवाहन त्यांचे मार्गदर्शनात केले.


3 thoughts on “पुणे शहरातील सार्वजनिक गणेशोत्सव २०२५ शांततेत व सुरळीत पार पडावा यासाठी पोलीस प्रशासनाने कसली कंबर…..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!