बिबवेवाडी आई माता मंदिर परिसरात डोंगर माथा-उतारावर अनधिकृत शेड बांधकामांचा सुळसुळाट; पुणे महानगरपालिका प्रशासन मूकदर्शक….
पुणे प्रतिनिधी :- मिलिंद राजहंस
बिबवेवाडीतील आई माता मंदिर परिसरातील डोंगर माथा आणि डोंगर उतारावर अनधिकृत शेड व पक्क्या बांधकामांचा उच्छाद सुरू असून, पुणे महानगर पालिकेचा बांधकाम नियंत्रण झोन 5 विभाग मूकदर्शकाची भूमिका घेत आहे. पर्यावरणीय नियम, बांधकाम परवाना आणि झोनिंग कायद्यांचा उघड उघड भंग होत असतानाही कारवाईचा बोजवारा उडाल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप आहे.

सदर परिसर शासन नकाशानुसार ‘नो डेव्हलपमेंट झोन’ (NDZ) किंवा संरक्षित क्षेत्र म्हणून अधिसूचित आहे. मात्र या संरक्षणाचा फज्जा उडवत. संत निरंकारी भवन शेजारी शहा नामक जागा मालकाने लेबर कॅम्प नवा खाली मोठमोठे गोडाऊन, लोखंडी पत्र्यांचे शेड, पक्की भिंती व छप्पर बांधकामे केली आहेत व दिवसेंदिवस वाढत आहेत. या बांधकामांमुळे डोंगराचे नैसर्गिक सौंदर्य, पाणी साठवण क्षमता आणि जैवविविधता धोक्यात आली आहे.
Advertisement
स्थानिक नागरिकांनी व ग्राहक हक्क संघर्ष समितीने वारंवार तक्रारी केल्या, पत्रव्यवहार केला, तरी संबंधित बांधकाम विभाग, महसूल व पर्यावरण खात्याकडून कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. परिणामी अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांचे मनोबल वाढले आहे.
परिसरातील पर्यावरणप्रेमी व सामाजिक संघटनांनी तातडीने कारवाई न झाल्यास न्यायालयीन याचिका आणि मोठा जनआंदोलन उभारण्याचा इशारा दिला आहे. प्रशासनाच्या या निष्क्रिय भूमिकेमुळे “अनधिकृत बांधकामांना सरकारी मूक पाठिंबा आहे का?” असा सवाल नागरिकांतून उपस्थित होत आहे.




https://shorturl.fm/G0rUZ
https://shorturl.fm/hsTtw
https://shorturl.fm/WAl0Q