सराईत गुन्हेगार गावठी पिस्टलसह शिवाजीनगर पोलिसांच्या जाळ्यात; गुन्हेगारीवर पोलिसांचा करारी घाव…


पुणे प्रतिनिधी :- मिलिंद राजहंस

पुणे शहरात गणेश उत्सवात सराईत गुन्हेगार दहशत करण्याच्या हेतूने मोठया प्रमाणत हत्यारे, अग्निशस्त्रे (पिस्टल) घेऊन परिसरात फिरताना दिसतात. कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी आपले पोलीस प्रशासन सज्य असते. सराईत गुन्हेगारांना वेळीच जेरबंद करून नागरिकांना दिलासा देतात. असे असता शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी मोठी कारवाई करत एका सराईत गुन्हेगारास पाठलाग करून अटक केली असून त्याच्याकडून गावठी पिस्तूल व एक जिवंत काडतूस जप्त करण्यात आले आहे. ही कारवाई शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या विशेष पथकाने केली.

सदर पोलिसांनी दिलेल्या माहिती अनुसार सराईत गुन्हेगार, रेकार्ड वरील गुन्हेगार अभिषेक टेंकल दि. .०७/०८/२०२५ रोजी पोलीस अंमलदार सचिन जाधव यांना गुप्त बातमीदारा कडून बातमी मिळाली की ज्ञानेश्वर पादुका चौक, दिनदयाळ हॉस्पीटल शेजारी गल्ली, एफ सी रोड येथे जाऊन थोडे आड बाजूस थांबून पाहिले असता एक इसम आम्हाला संशयास्पद दिसला. त्याने आमचेकडे पाहिले असता तो तेथुन पळ काढु लागला तेव्हा आम्ही त्याचा पाटलाग करुन शिताफीने पकडून त्यास आमची स्वतःची व सोबतच्या स्टाफची, पंचाची ओळख सांगून त्याचे अंगझडतीचे कारण त्यास सांगून त्याचे नाव पत्ता विचारता त्याने त्याचे नाव पत्ता अभिषेक राजू टेंकल वय २३ वर्ष रा. प्लॉट नंबर ४१ विष्णुकृपा नगर, शिवाजीनगर रेल्वे स्टेशनजवळ, शिवाजीनगर पुणे असे सांगितले. तेव्हा नमुद इसमाची पंचा समक्ष अंगझडती घेतली असता त्याच्या कमरेला ३६,०००/- रु. कि.चा एक गावठी पिस्टल व मॅगझीनमध्ये एक राऊड मिळून आल्याने शिवाजीनगर पो.स्टे.गु.र.नं. १२४/२०२५ भारतीय हत्यार कायदा कलम ३ (२५) महाराष्ट्र पोलीस अधिनियम क. ३७ (१) सह १३५ अन्वये गुन्हा नोंद करुन त्यास दाखल गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे.

सदरची कामगिरी ही मा., अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग, पुणे शहर, श्री. राजेश बनसोडे मा. पोलीस उप-आयुक्त, परि ०१, पुणे शहर, श्री. कृषिकेश रावले, मा. सहा. पोलीस आयुक्त, विश्रामबाग विभाग, पुणे श्री. साईनाथ ठोंबरे यांचे मार्गदर्शनाखाली शिवाजीनगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, श्री. महेश बोळकोटगी, पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री. धनंजय पिंगळे यांचे सुचना प्रमाणे पोलीस उप-निरीक्षक अजित बडे, व पोलीस अंमलदार दिपक चव्हाण, प्रमोद मोहिते, महावीर वलटे, सचिन जाधव, दिपक रोमाडे, इसाक पठाण, कृष्णा सांगवे, सुदाम तायडे यांनी केली आहे….


2 thoughts on “सराईत गुन्हेगार गावठी पिस्टलसह शिवाजीनगर पोलिसांच्या जाळ्यात; गुन्हेगारीवर पोलिसांचा करारी घाव…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!