धडाकेबाज निर्णय घेणाऱ्या पुणे महापालिकेचे आयुक्त मा. नवल किशोर राम यांच्या वर मनसे कार्यकर्त्यांचा हल्ला..


पुणे प्रतिनिधी :- मिलिंद राजहंस

पुणे महानगरपालिका आयुक्त नवल किशोर राम हे नियुक्त झाल्या पासून अनेक धडाकेबाज निर्णय घेत उत्तम प्रशासक असल्याचे दिसत असताना. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी महानगरपालिकेच्या आयुक्त दालनात अनधिकृत प्रवेश करून अधिकाऱ्यांसमवेत बैठक सुरू असतानाच मनसेचे अॅड. किशोर शिंदे यांनी थेट बैठकीत घुसून आयुक्त नवल किशोर राम यांच्याशी अरेरावी करीत राडा घातला. आयुक्तांनी संतापून त्यांना ‘आप बाहर जाओ’ असे सांगितले. त्यावर ‘मराठीत बोला’ असा आग्रह धरत शिंदे आयुक्तांवर धावून गेले. सुरक्षारक्षकांनी वेळीच धाव घेत शिंदे यांना रोखले आणि बैठकीबाहेर काढले..

Advertisement

बुधवारी सायंकाळी मनसेचे पदाधिकारी अॅड. किशोर शिंदे यांच्यासह मनसे कार्यकर्ते महापालिकेत आले. आयुक्त बंगल्यातून गायब झालेल्या वस्तूंबाबत पोलिसांत गुन्हा दाखल करून या प्रकरणाची चौकशी करण्याचे निवेदन त्यांना आयुक्तांना द्यायचे होते. दरम्यान, त्याचवेळी आयुक्तांची वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत मीटिंग हॉलमध्ये बैठक सुरू होती. अॅड. शिंदे थेट बैठक हॉलमध्ये शिरले. अचानक बैठकीत घुसल्याने त्यांच्या एन्ट्रीमुळे बैठक डिस्टर्ब झाल्याने आयुक्तांनी ‘तुम्ही कोण आहात?’ अशी विचारणा केली. त्यावर शिंदे यांनी ‘मी माजी नगरसेवक आहे, दोनवेळा विधानसभेची निवडणूक लढलो आहे,’ असे उत्तर दिले. त्यावर आयुक्तांनी त्यांना ‘आप बाहर जाओ’ असे सांगितले. त्यामुळे चिडलेल्या शिंदे यांच्यासह मनसे पदाधिकाऱ्यांनी ‘मराठीत बोला’ असे सांगितले, त्यामुळे हा वाद वाढला. त्यातच शिंदे यांनी आयुक्तांवर धावून जात त्यांच्यावर हात उगारला, असे उपस्थित अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. मात्र, सुरक्षारक्षकांनी त्यांना वेळीच रोखत बाहेर काढले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी आयुक्त दालनासमोर ठिया मांडला असताना महानगरपालिकेच्या प्रशासनाने त्वरित पोलिसांना बोलावून कार्यकर्त्यांना बाहेर काढले. पुणे महानगरपालिकेचे प्रशासकीय अधिकारी रात्री उशिरा शिवाजीनगर पोलीस ठाण्यात पोचले मनसे कार्यकर्त्यांनी सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी व बेकायदेशीर ठिय्या आंदोलन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून माजी नगरसेवक अॅड किशोर शिंदे व सहकारी कार्यकर्ते नावे देण्यात आली..

नवनियुक्त पुणे महानगरपालिका आयुक्त नवल किशोर राम नियुक्ती झाल्यापासून अनेक धडाकेबाज निर्णय घेऊन पुणे शहराच्या सर्वांगीक विकासासाठी कार्य करत असताना हिंदी बोलण्यामुळे, मराठी भाषेचा आग्रह धरणे अश्या प्रकारे प्रशासकीय अधिकाऱ्याच्या अंगावर धावून जाणे हे पुणे शहरा साठी योग्य नाही….
ग्राहक जागृती न्यूज संपादक :- मिलिंद राजहंस


5 thoughts on “धडाकेबाज निर्णय घेणाऱ्या पुणे महापालिकेचे आयुक्त मा. नवल किशोर राम यांच्या वर मनसे कार्यकर्त्यांचा हल्ला..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!