हडपसर, वानवडी, कोंढवा, परिसरातील तब्बल 6 रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगारांवर तडीपारची कारवाई….


पुणे प्रतिनिधी :- मिलिंद राजहंस

पुणे शहर पोलीस आयुक्तालयातील गुन्हेगारीवृत्तीस आळा घालणेकामी परिमंडळ ५ हद्दीतील पोलीस स्टेशनचे रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगारांवर ठोस व परिणामकारक अशी कारवाई करणे आवश्यक होते. म्हणून महाराष्ट्र पोलीस अधिनियम सन १९५१ चे कलम ५६ प्रमाणे एकुण ०६ सराईत गुन्हेगारांना पुणे शहर, पिंपरी चिंचवड शहर व पुणे ग्रामिण जिल्ह्याचे हद्दीतुन ०२ वर्षे कालावधीकरीता तडीपार करण्यात आलेले आहे.

हे सर्व आरोपी सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत.

महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 56 अन्वये ही तडीपार कारवाई करण्यात आली आहे.

संबंधित आरोपींनी पुणे शहर व पुणे जिल्ह्यातील काही भागांत दहशत निर्माण केली होती.

तडीपार केलेले आरोपी व तपशील :-

1 हडपसर  इस्मीयाज ईब्राहीम मेमन (वय 54) 2 वर्षे
2 वानवडी  अजिम रफिक शेख (वय 38) 2 वर्षे
3 वानवडी  असिफ शेख लियाकत शेख (वय 34) 2 वर्षे
4 कोंढवा  इमरान अब्दुल पटेल (वय 23) 2 वर्षे
5 कोंढवा आकाश नरसैया गुप्तदार (वय 25) 2 वर्षे
6 कोंढवा आदित्य तानाजी पाचपुते (वय 20) 2 वर्षे

वरील सदर आरोपी सराईत गुन्हेगार असून खुनाचा प्रयत्न करणे, दुखापत करणे, मारहाण करणे, गंभीर दुखापत करणे, बेकायदेशीर हत्यार जवळ बाळगुन दहशत निर्माण करणे यासारखे हातभट्टी विकणे असे अनेक गुन्हे दाखल आहेत.

Advertisement

उपरोक्त नमुद सर्व तडीपार इसम हे रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आहेत. परिमंडळ ५ कार्यक्षेत्रातील गुन्हेगारांच्या हालचालींवर आगामी सण / उत्सवाचे पार्श्वभुमीवर पोलीसांचे बारकाईने लक्ष आहे. सराईत गुन्हेगारांना गुन्हे करण्यापासुन परावृत्त करण्यासाठी व गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी आणखी काही गुन्हेगारांवर मोका, एमपीडीए, तडीपार कारवाईची प्रक्रिया सुरु आहे.

माहे जानेवारी २०२५ पासुन परिमंडळ ५ कार्यालयाकडुन आज पावेतो १३ सराईत गुन्हेगारांवर एम.पी.डी.ए. प्रमाणे कारवाई करण्यात आली आहे, तसेच ९ मोका कारवाईमध्ये ५६ गुन्हेगारांना जेरबंद करण्यात आले आहे, तसेच आज पावेतो २५ गुन्हेगारांना तडीपार करण्यात आले आहे. असे एकुण ९४ सराईत गुन्हेगारांवर ठोस व परिणामकारक कारवाई करण्यात आली आहे.

वरीलप्रमाणे तडीपार करण्यात आलेले सराईत गुन्हेगार हे त्यांचे हद्दपार कालावधीमध्ये पुणे शहर पोलीस आयुक्तालय, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय व पुणे जिल्हयामध्ये दिसुन आल्यास तात्काळ पोलीस नियत्रंण कक्ष संपर्क क्र. ११२ तसेच जवळील अथवा संबंधित पोलीस ठाणेस किंवा इकडील कार्यालयात संपर्क क्र. ०२०-२६८६१२१४ यावर संपर्क साधुन माहिती कळविण्याबाबत आम्ही डॉ. राजकुमार शिंदे, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ५ पुणे शहरातील सर्व नागरीकांना याद्वारे आवाहन करीत आहोत.

 


7 thoughts on “हडपसर, वानवडी, कोंढवा, परिसरातील तब्बल 6 रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगारांवर तडीपारची कारवाई….

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!