पुणे शहरात पुन्हा एकदा भरदिवसा वाळू व्यावसायिकावर गोळीबार, एक अल्पवयीन मुलासह दोन जणांना अटक


पुणे प्रतिनिधी :- मिलिंद राजहंस

पुणे शहरात आंदेकर खून, एका पाठोपाठ एक गोळीबारच्या घटनाने शहरात दहशत निर्माण करण्याचा प्रकार घडत आहेत. गणेश उत्सवात अश्या प्रकारे गोळीबाच्या घटना घडत असल्यामुळे पुणे शहराची कायदा सुवेवस्था बिघडली आहे पोलिसांच्या कार्याप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्तित होत आहे…

दिलीप बाळासाहेब गायकवाड (वय ४३, रा. कोंढवा) यांचे बिल्डिंग मटेरियल सप्लायरवर त्याच्याच दुकानात गोळीबार करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. संबंधित व्यावसायिकाच्या पोटात गोळी लागली असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
त्यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे पोलिसांनी सांगितले. ही घटना सोमवारी दुपारी साडेबारा ते पाऊण वाजण्याच्यादरम्यान घडली. दरम्यान, या हल्ल्यामागील नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही. पोलिसांनी तीन जणांना ताब्यात घेतले आहे. सदर प्रकारामध्ये आरोपी नामे बबलू सय्यद,तन्मय सखाराम भुसारे वय 19 वर्ष, आकाश अरुण जगताप वय 21 वर्ष यांना ताब्यात घेण्यात आले आहे.

Advertisement

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गायकवाड यांचा बांधकाम साहित्य विक्रीचा व्यवसाय आहे. कोंढवा-बिबवेवाडी सीमेवर असलेल्या साळवे गार्डनजवळील चोरडीया कॉर्नर येथे त्यांचे दुकान आहे. या दुकानात ते खडी, सीमेंट आणि विटा
विकतात. नेहमीप्रमाणे ते सोमवारी दुपारी दुकानात काम करीत होते. त्यावेळी जगताप, भुसारी आणि सय्यद दुचाकीवरून तेथे आले. काही कळायच्या आतच ते दुकानात शिरले. त्यांनी गायकवाड यांना दुकानातील विटा आणि सीमेंट बाबत माहिती विचारली. सुरुवातीला सीमेंटचे दर विचारले. त्यानंतर, सुखसागर नगर येथे एक हजार विटा लागणार असून त्या तुम्ही देणार का? अशी विचारणा केली. त्यांना विटांचे दर विचारले. त्याच दरम्यान, आरोपीपैकी एकाने त्याच्याकडील पिस्तुलामधून गायकवाड यांच्यावर गोळी झाडली. ही गोळी पोटात उजव्या बाजूला लागलेली गोळी पुढे मणक्यात जाऊन अडकल्याने पोलिसांनी सांगितले.

पोलीस आणि स्थानिक नागरिकांनी आरोपींना जागेवरच ताब्यात घेतले. यातील जगताप आणि भुसारे दोन तरुण हे याच भागातील व्हीआयटी कॉलेजजवळ राहण्यास आहेत. या हल्ल्यामागे कुटुंबातील जवळच्या व्यक्तीचा समावेशहल्ल्यामागे कुटुंबातील जवळच्या व्यक्तीचा समावेश असल्याची माहिती पोलिसांच्या तपासात समोर आली आहे. या कुटुंबातील व्यक्तीसोबत गायकवाड यांचे वाद आहेत. त्या वादाच्या पार्श्वभूमीवर आरोपीने जगताप, सय्यद आणि भुसारे यांच्या मदतीने हा हल्ला केल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. याप्रकरणाचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.

 


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!