महाकारुणी तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या *पवित्र अस्थी धातू महायात्रा वर्धा आर्वी शहरातही आगमन


वर्धा प्रतिनिधी :- अर्पित वाहणे

*इंडो एशियन मेत्ता फाऊंडेशन इंडिया द्वारा* संपूर्ण महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यात ही महायात्रा आयोजित करण्यात आले असून आर्वी शहरात
या महा यात्रेचे आगमन होणार आहे.
दिनांक 23 सप्टेंबर 2024 ला इंडो एशियन मेत्ता फाऊंडेशन इंडिया द्वारा आर्वी शहरात तथागत भगवान बुद्ध यांच्या पवित्र अस्थी धातू कलश व परमपूज्य बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थी कलश महायात्रेचे आगमन होणार आहे.

Advertisement

दिनांक 23 सप्टेंबर 2024
सकाळी 10.00 वाजता
रमाई बुद्ध विहार भादोळ पुनर्वसन येथे या बुद्ध अस्थी धातू महायात्रा रथाचे आगमनानिमित्त स्वागत करण्यात येणार असून
छत्रपती शिवाजी महाराज चौक ते सहकार मंगल कार्यालय आर्वी पर्यंत या भव्य अस्थी धातू रथासहित भव्य महायात्रा आयोजित करण्यात आलेली आहे. भव्य धम्म रॅली नंतर
सहकार मंगल कार्यालय वर्धा रोड आर्वी येथे
पवित्र अस्थिधातू वंदना व अभिवादन कार्यक्रम व श्रीलंका देशातील पुज्यनिय भिक्खू संघाद्वारे धम्मदेसना होणार आहे.
त्यानंतर सर्व उपस्थितितांना अस्थिदर्शन व अभिवादन वंदन कार्यक्रम सुरू होईल. स्वागत समिती द्वारे सर्व उपस्थित पाहुण्यांचे स्वागत करण्यात येईल.
तरी आर्वी आष्टी कारंजा व वर्धा जिल्ह्यातील तमाम नागरिकांनी
या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहावे असे आवाहन
*धम्म प्रचारक सुरेश भिवगडे व सुजित भिवगडे व आयोजक मंडळीच्या वतीने करण्यात आले आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!