पुणे शहरात राँग साईड व ट्रिपल सीट वाहन चालविणा-या वाहन चालकांकडून तब्ब्ल ९४,६९,५००/- रू. दंडाची रक्कम वसुली
पुणे प्रतिनिधी :- मिलिंद राजहंस
पुणे शहरातील वाहन चालकांनी वाहतूकीचे नियम पाळण्याकरीता वाहतूक शाखेकडून विशेष कारवाई करण्यात येत आहे. विशेष कारवाई मध्ये मोटार वाहन कायद्याअंतर्गत अशा राँग साईड व ट्रिपल सीट वाहन चालविणा-या वाहन चालकांवर कारवाई करण्यात आली आहे.
सदर विशेष कारवाई अंतर्गत दि.०७/०९/२०२४ ते दि.१०/०९/२०२४ या कालावधी मध्ये राँग साईडने वाहन चालविणा-या एकूण १०६६ वाहन चालकांवर कारवाई करून त्यांचेकडून ३,१७,०००/- रू. दंडाची रक्कम वसूल करण्यात आली आहे. तसेच नमूद कालावधीमध्ये ट्रिपल सीट वाहन चालविणारे एकूण २१०१ वाहन चालकांवर कारवाई करण्यात आली असून त्यांचेकडून २०,९९,०००/- रू. दंडाची रक्कम वसूल करण्यात आली आहे.
त्याचप्रमाणे सदर विशेष कारवाई अंतर्गत दि.०१/०८/२०२४ ते दि.३१/०८/२०२४ या कालावधीमध्ये राँग साईडने वाहन चालविणा-या एकूण ६७५० वाहन चालकांवर कारवाई करून त्यांचेकडून २३,३३,५००/- रू. दंडाची रक्कम वसूल करण्यात आली आहे. तसेच नमूद कालावधीमध्ये ट्रिपल सीट वाहन चालविणारे एकूण ४८५९ वाहन चालकांवर कारवाई करण्यात आली असून त्यांचेकडून ४७,२०,०००/- रू. दंडाची रक्कम वसूल करण्यात आली आहे.
अशाप्रकारे दि.०१/०८/२०२४ ते दि.१०/०९/२०२४ या कालावधीमध्ये राँग साईडने वाहन चालविणारे व ट्रिपल सीट वाहन चालविणारे एकूण १४७७६ वाहन चालकांवर कारवाई करून त्यांचेकडून ९४,६९,५००/- रू. दंडाची रक्कम वसूल करण्यात आली आहे. अशा नियमभंग करणारे वाहन चालकांचे वाहन परवाने निलंबित करण्याची प्रक्रिया वाहतूक शाखेकडून करण्यात येत आहे.



