९५,४०० रुपये किंमतीचे अमंली पदार्थाची विक्री करणाऱ्या इसमास बिबवेवाडी पोलीसांनी केली अटक
पुणे प्रतिनिधी :- मिलिंद राजहंस
पुणे शहर परिसरात बिबवेवाडी सारख्या उपनगरात परप्रांतीय नागरिक मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ विक्री करत असून तरुण वर्ग व्यसनाच्या आहारी जाऊन आयुष उदबस्त करत आहे. बिबवेवाडी पोलीस स्टेशनने तब्ब्ल ९५,४०० रुपये किंमतीचे अमंली पदार्थाची विक्री करणाऱ्या इसमास अटक केले..
सदरबाबत अधिक माहिती अशी की, दिनांक २२/०८/२०२४ रोजी, सहा. पोलीस निरीक्षक श्री संजय निकुंभ, पोलीस उप निरीक्षक अशोक येवले व तपास पथकातील स्टाफ असे मा. वरिष्ठांचे आदेशान्वये बिबवेवाडी पोलीस स्टेशन कार्यक्षेत्रामध्ये अंमली पदार्थाचे गैरव्यवहाराचे अनुषंगाने बिबवेवाडी पोलीस स्टेशचे हददीत पेट्रोलिंग करीत असताना पेट्रालिंग दरम्यान पोलीस अमंलदार अभिषेक धुमाळ यांना मिळालेल्या बातमीवरून १९/३० वा. चे सुमारास, नाज पान शॉप शेजारील गल्लीमध्ये, फाशी गेट चौक, गंगाधाम रोड पुणे येथे इसम नामे जुबेर ऊर्फ सुलतान लतीफ खान, वय २७ वर्षे, धंदा मजुरी, रा. अश्रफनगर गल्ली नं. ०७, कोंढवा पुणे. मुळ पत्ता- ग्राम-फकीरीबन खेड, तहसिल- उतरोला, जि. बलरामपूर राज्य – उत्तरप्रदेश हा त्याचे ताब्यात किं. रु. ९५,४००/- रु चे ०५ ग्रॅम २७ मिलीग्रॅम मेफेड्रॉन (एम.डी.), कि.रु. १०,०००/- चा एक ओप्पो कंपनीचा मोबाईल हॅण्डसेट व इसम नामे स्वप्निल बापू शिंदे, वय-२८ वर्षे, काम-नोकरी, रा. लक्ष्मी नगर, लेन नं ८, कोंढवा बुद्रुक, पुणे, मुळ गाव. शेनवड, ता. वेल्हा, जि. पुणे हा त्याचे ताब्यात किं.रु. ६५,०००/-रु चे ०३ ग्रॅम २५ मिलीग्रॅम मेफेड्रॉन (एम.डी.), कि.रु. ४०,०००/- चा एक अॅपल कंपनीचा आयफोन ११ मोबाईल हॅण्डसेट असा एकुण २,१०,४००/- रु किंमतीचा ऐवज अनाधिकाराने, बेकायदेशिररित्या विक्रीकरीता जवळ बाळगताना मिळुन आलेने ते गुन्हयाचे जप्त करण्यात आलेले असून आरोपीविरुध्द बिबवेवाडी पोलीस स्टेशन गुन्हा रजि. नं.२०२/२०२४ एन.डी. पी. एस. अॅक्ट कलम ८ (क), २१ (ब) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नमुद आरोपीकडे तपासा दरम्यान सदर जप्त अंमली पदार्थ त्यांचा पाहिजे साथीदार नामे आसिफ ऊर्फ मुबासीर अन्सारी रा. कासेवाडी पुणे पूर्ण नाव पत्ता माहित नाही. याचेकडून खरेदी केल्याचे निष्पन्न झाले आहे. दाखल गुन्हयाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक श्री मनोजकुमार लोंढे हे करीत आहेत.

