माजी नगरसेवक वनराज आंदेकर खून प्रकरणातील फरार सूत्रधार प्रसाद बेल्हेकर याला गुन्हे शाखेने अटक केली
पुणे प्रतिनिधी :- मिलिंद राजहंस
माजी नगरसेवक वनराज आंदेकर खून प्रकरणातील फरार सूत्रधार प्रसाद बेल्हेकर याला गुन्हे शाखेने अटक केली. बेल्हेकरला न्यायालयाने २४ सप्टेंबरपर्यंत कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. आंदेकर खून प्रकरणात आतापर्यंत २० जणांना अटक करण्यात आली असून, दाेन अल्पवयीनांना ताब्यात घेण्यात आले.
अटक आरोपी प्रसाद पांडुरग बेल्हेकर याचेवर आंदेकर टोळीतील ऋषभ आंदेकर याने हल्ला केल्याने सदर गोष्टीचा राग मनात धरुन त्याने अटक आरोपी गणेश कोमकर, सोमनाथ गायकवाड, तुषार कदम, समीर काळे व अनिकेत दुधभाते यांचा एकमेकांशी संपर्क होण्याकरिता दुआ (माध्यम) बनुन व कटात सहभागी होवुन मयत वनराज आंदेकर याचेवर दिनांक ०१/०९/२०२४ रोजी पिस्टलने फायर करुन व कोयत्याने वार करुन मयताचे खुनास कारणीभुत झालेने सदर आरोपीचा उपरोक्त गुन्हयामध्ये स्पष्ट सहभाग निष्पन्न झाला आहे तसेच सदर गुन्हयाचे तपासामध्ये इतर बाबींचा देखील उलगडा होण्याची दाट शक्यता आहे.
सदर आरोपीस दिनांक १९/०९/२०२४ रोजी सायंकाळी अटक केली असुन त्यास दिनांक २४/०९/२०२४ रोजी पर्यंत पोलीस कस्टडी रिमांड प्राप्त झाली असुन सदर गुन्हयाचा आधिक तपास चालु आहे.
सदरची कामगिरी मा.श्री अमितेश कुमार, साो पोलीस आयुक्त, पुणे शहर, मा. श्री रंजनकुमार शर्मा, साो सह पोलीस आयुक्त, पुणे शहर, मा. श्री शैलेश बलकवडे साो अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, मा. श्री निखील पिंगळे साो पोलीस उप-आयुक्त, गुन्हे, पुणे शहर, मा. श्री गणेश इंगळे, सहाय्यक पोलीस आयुक्त, गुन्हे-१, पुणे शहर, यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक शब्बीर सय्यद युनिट ०१,
सहा. पो. निरी अभिजीत पाटील, पो. शि. शुभम देसाई व पो.ना. राजेंद्र लांडगे यांनी केली आहे.



