“पुण्यात भाजपची गुप्त रणनीती उघड! उमेदवारांना फोन वरून ए-बी फॉर्म, कार्यकर्त्यांत प्रचंड संभ्रम”
पुणे प्रतिनिधी :- मिलिंद राजहंस, गणेश तुम्मा..
भाजपच्या उमेदवार यादी जाहीर होण्यावरून गेल्या काही दिवसांपासून तारखांचा लपंडाव सुरू होता. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अवघे काही तास शिल्लक असतानाही अधिकृत यादी जाहीर न झाल्याने इच्छुक उमेदवारांचा जीव टांगणीला लागला होता. मात्र आता भाजपकडून अधिकृत यादी न जाहीर करता थेट फोनवरून उमेदवारी निश्चित करण्याची खेळी खेळली जात असल्याचे समोर आले आहे.
बंडखोरी टाळण्यासाठी भाजपने ही गुप्त रणनीती आखली..
ज्यांची उमेदवारी निश्चित झाली आहे त्यांना थेट पक्षाच्या प्रमुख नेत्यांकडून फोन करून अर्ज भरण्याचा निरोप दिला जात आहे. त्याचबरोबर संबंधित उमेदवारांना पक्षाचे ए आणि बी फॉर्मही गुप्तपणे पोहोचवले जात आहेत.
आतापर्यंत गणेश बिडकर, स्वरदा बापट, कुणाल टिळक, श्रीनाथ भिमाले यांच्यासह अनेक माजी नगरसेवकांना भाजपकडून ए–बी फॉर्म देण्यात आल्याची माहिती आहे. मात्र याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नसल्याने नेमकी उमेदवारी कोणाला मिळाली, याबाबत मोठा संभ्रम निर्माण झाला आहे.
दरम्यान, भाजपमधून पहिला अधिकृत उमेदवारी अर्ज गणेश बिडकर यांनी दाखल केला असून, त्यांच्यासोबत सायली वांजळे, माधुरी सहस्त्रबुद्धे, योगेश मुळीक यांनीही अर्ज दाखल केले आहेत. काही नेत्यांना ए–बी फॉर्म देण्यात आले असले तरी त्यांच्या नावांची अधिकृत घोषणा अद्याप झालेली नाही.
अशातच पुणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने दि. 29 डिसेंबर रोजी पुण्यातील काही प्रभागांची अधिकृत उमेदवार यादी जाहीर केली आहे.
अधिकृत उमेदवार यादी जाहीर केली आहे.
भाजपची जाहीर उमेदवार यादी :
प्रभाग 9 : सुस – बाणेर – पाषाण
अमोल बालवडकर, गणेश कळमकर, मयुरी राहुल कोकाटे, रोहिणी चिमटे
प्रभाग 10 : बावधन – भुसारी
किरण दगडे, दिलीप वेडे, अल्पना गणेश वर्पे, रूपाली सचिन पवार
प्रभाग 11 : रामबाग कॉलनी – शिवतीर्थनगर
अजय मारणे, शर्मिला नितीन शिंदे, अभिजित राऊत
प्रभाग 29 : डेक्कन जिमखाना – हॅप्पी कॉलनी
मिताली कुलदीप साळवेकर, पुनीत जोशी, सुनील पांडे, मंजुश्री खर्डेकर
प्रभाग 30 : कर्वेनगर – हिंगणे होम कॉलनी
राजाभाऊ बराटे, सुशील मेंगडे, तेजश्री महेश पवळे, रेश्मा संतोष बराटे
प्रभाग 31 : मयूर कॉलनी – कोथरूड
पृथ्वीराज सुतार, निलेश कोंढाळकर, वासंती जाधव, हर्षाली माथवड
प्रभाग 32 : वारजे – पॉप्युलरनगर
भारतभूषण बराटे, सायली वांजळे, सचिन दोडके, हर्षदा शंतनु भोसले
प्रभाग 33 : शिवणे – खडकवासला – धायरी भाग
सुभाष नाणेकर, किशोर पोकळे, ह.भ.प. ममता सचिन दांगट, धनश्री दत्ता कोल्हे
प्रभाग 34 : नर्हे – वडगाव बुद्रूक – धायरी
हरिदास चरवड, राजाभाऊ लायगुडे, जयश्री भूमकर, कोमल नवले
प्रभाग 35 : सनसिटी – माणिकबाग
ज्योती गोसावी, श्रीकांत जगताप, सचिन मोरे, मंजुषा नागपुरे



