SC आरक्षणावर राजकीय डल्ला? प्रभाग 26 (अ) मध्ये BJP उमेदवाराच्या जातीच्या दाखल्याचा स्फोट!”


पुणे प्रतिनिधी :- मिलिंद राजहंस,गणेश तुम्मा..

पुणे महानगरपालिका प्रभाग क्रमांक 26 (अ) मध्ये निवडणुकीच्या तोंडावर राजकीय भूकंप झाला असून, Bharatiya Janata Party (BJP) च्या विष्णू आप्पा हरिहर नामक माजी नगरसेवक उमेदवाराने कथितपणे खोट्या जातीच्या दाखल्याच्या आधारे अनुसूचित जाती (SC) आरक्षणाचा लाभ घेतल्याचा गंभीर आरोप करणारा व्हिडिओ सोशल मीडियावर वणव्यासारखा पसरत आहे. या स्फोटक व्हिडिओमुळे संपूर्ण प्रभागात संतापाची लाट उसळली आहे…

संबंधित व्हिडिओ “लहुजी शासन ग्रुप (महाराष्ट्र राज्य)” या नावाने प्रसारित करण्यात आला असून, सनी डाडर यांनी थेट आरोप करत संबंधित उमेदवाराने बनावट कागदपत्रांच्या आधारे निवडणूक लढवली असल्याचा दावा केला आहे. व्हिडिओ व्हायरल होताच प्रशासन, राजकीय पक्ष आणि निवडणूक यंत्रणा यांच्यावर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.

निवडणूक यंत्रणा हतबल?

Advertisement

या प्रकरणी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिलेल्या लेखी उत्तरात उमेदवारी अर्जासोबत सादर केलेली कागदपत्रे “प्राथमिक स्वरूपात ग्राह्य” असल्याचे नमूद केले आहे. मात्र, जातीच्या दाखल्याची अंतिम पडताळणी करण्याचा अधिकार जात पडताळणी समितीकडे असल्याने, निवडणूक अर्जाच्या टप्प्यावर उमेदवारी रद्द करता येणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
व्हिडिओ समोर, तरी कारवाई शून्य?
व्हिडिओमध्ये थेट आरोप, कागदपत्रांवर बोट ठेवले जात असतानाही तातडीची चौकशी का नाही?
हा प्रश्न आता प्रभागातील नागरिक, दलित संघटना आणि सामाजिक कार्यकर्ते उघडपणे विचारू लागले आहेत.
आरोप खोटे असतील तर त्याचे तात्काळ खंडन का नाही?
आरोप खरे असतील तर निवडणूक लढवण्याची परवानगी कशी?
SC आरक्षणाच्या हक्कांवर गदा येत असेल तर जबाबदारी कुणाची?

जनतेचा विश्वास पणाला!

निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकता, आरक्षण व्यवस्थेची पवित्रता आणि लोकशाहीवरील जनतेचा विश्वास या तिन्ही बाबी या प्रकरणामुळे पणाला लागल्या आहेत.
“कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे” एवढ्यावर विषय थांबवणे म्हणजे संशयाला खतपाणी घालण्यासारखे असल्याची तीव्र भावना प्रभागात व्यक्त होत आहे.
पूर्ण चौकशीची मागणी जोर धरतेय
नागरिकांकडून या प्रकरणात स्वतंत्र, निष्पक्ष आणि वेळबद्ध चौकशीची जोरदार मागणी होत असून, निवडणूक होण्यापूर्वी संपूर्ण सत्य जनतेसमोर यावे, अशी ठाम भूमिका घेतली जात आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!