वासनेने भुकेलेला लांडग्यांसमोर पुणे शहरात महिला पोलीस अधिकारी ही सुरक्षित नाहीत…
पुणे प्रतिनिधी :- मिलिंद राजहंस
पुणे शहर हे विद्येचे माहेरघर, संतांची पावनभूमी, सांस्कृतिक राजधानी, छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा जपलेले या शहरात एखाद्या प्रशासकीय महिला पोलीस अधिकाऱ्यचा विनयभंग होणे हे न शोभाणारे आहे आणि ते ही सत्ताधारी भाजपाच्या प्रतिष्ठित पदाधिकारी यांनी विनयभंग करणे हे पुणे शहराला लाजिरवाणी बाब आहे….
याबाबत पीडित महिला पोलीस अधिकारी स्वतः cctv फुटेज तपासून संबंधित महिला पोलीस अधिकार्याच्या पाठीमागे उभे राहून घृणास्पद कृत्य करुन विनयभंग केल्याच्या आरोपावरून भाजपचे शहर महामंत्री, कसबा विधानसभा अध्यक्ष प्रमोद कोंढरे यांच्यावर फरासखाना पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या दौर्यादरम्यान हा प्रकार घडला आहे. प्रमोद कोंढरे हे भाजपचे शहर महामंत्री आहेत. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे मंगळवारी सकाळी साडेनऊ वाजता शनिवारवाडा येथे भुयारी मार्ग प्रकल्पाची पाहणी करण्यासाठी येणार होते. त्यामुळे भाजपचे पदाधिकारी तेथे आले होते. अचानक पाऊस येऊ लागल्याने सर्व जण जवळच असलेल्या अभिनंदन कडक चहा येथे गेले. यावेळी महिला पोलीस अधिकार्याच्या पाठीमागे जाणीवपूर्वक उभे राहून प्रमोद कोंढरे यांनी अत्यंत घृणास्पद कृत्य केल्यामुळे स्त्री मनास लज्जा उत्पन्नहोईल, असे वर्तन केल्याचे या महिला पोलीस अधिकारी यांनी सांगितले..
भाजपा शहर पदाधिकारी प्रमोद कोंढरे यांच्या वर या पूर्वी अनेक पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल आहेत 2015 मध्ये खडक पोलीस स्टेशन अंतर्गत जबरन वर्गणी मागण्याप्रकारणी गुन्हा दाखल केला होता. आणि 2011 मध्ये कोणत्या विरुद्ध विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. डेक्कन पोलीस ठाण्यात 2022 मध्ये विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर प्रकरणी वरिष्ठ पोलीस अधिकारी प्रशांत भस्मे यांच्या शी संपर्क होऊ शकला नाही…




https://shorturl.fm/211RI