आत्महत्या की राजकीय हत्या? व्हायरल ऑडिओने उघड केला कट; प्रभाग 41 मधील NCP उमेदवार फारुख इनामदार यांना अडकवण्याचा डाव!


पुणे प्रतिनिधी :- मिलिंद राजहंस

आत्महत्या नव्हे तर घातपात? व्हायरल ऑडिओ क्लिपने उघड केला कटाचा पर्दाफाश; प्रभाग 41 मधील NCP उमेदवार फारुख इनामदार यांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा गंभीर आरोप…

राज्यात चर्चेचा विषय ठरलेल्या पुणे महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर एक अत्यंत गंभीर आणि धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP) प्रभाग क्रमांक 41 मधील उमेदवार फारुख इनामदार यांच्याविरोधात दाखल करण्यात आलेल्या आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या गुन्ह्याबाबत आता नवीन आणि खळबळजनक खुलासा समोर आला आहे.
फारुख इनामदार यांच्यावर प्रभाग 41 मधील रहिवासी सादिक कपूर यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप ठेवत लष्कर पोलीस स्टेशन येथे गुन्हा क्रमांक 05/2026 अंतर्गत भारतीय न्याय संहिता 2023 मधील कलम 108, 308(2), 3(5) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
मात्र, या प्रकरणी माननीय जिल्हा व सत्र न्यायालय, शिवाजीनगर, पुणे यांनी दिनांक 9 जानेवारी 2026 रोजी लष्कर पोलिसांना फारुख इनामदार यांना अटक न करण्याचे स्पष्ट आदेश दिले. त्यामुळे त्यांच्या निवडणूक प्रचाराचा मार्ग मोकळा झाला आहे.

Advertisement

व्हायरल ऑडिओ क्लिपमुळे कटाचा पर्दाफाश
दरम्यान, या प्रकरणाशी संबंधित एक धक्कादायक ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली असून, त्यामुळे संपूर्ण प्रकरणाला वेगळेच वळण मिळाले आहे.
या ऑडिओ क्लिपमध्ये मोक्का कायद्यांतर्गत आरोपी असलेल्या मेहबूब शेख उर्फ पिट्या भाई याचा भाऊ हबीब पटेल हा तक्रारदार इमरान शेख याला दिनांक 6 जानेवारी रोजी मा. उच्च न्यायालयात मेहबूब शेख यांच्या बाजूने प्रतिज्ञापत्र (Affidavit) देण्यासाठी जबरदस्ती, दबाव व धमकी देत असल्याचे स्पष्टपणे ऐकू येते.
यावरून सदर प्रकरण हे पूर्वनियोजित कट असून, फारुख इनामदार यांना खोट्या गुन्ह्यात अडकवून निवडणूक प्रचारापासून दूर ठेवण्याचा षडयंत्र असल्याचे स्पष्ट होत आहे, असा दावा करण्यात येत आहे.

आत्महत्या नव्हे तर घातपात? गंभीर संशय…

व्हायरल ऑडिओ क्लिपमधील संभाषणाच्या आधारे ही घटना आत्महत्या नसून घातपात असण्याची शक्यता नाकारता येत नाही, असा गंभीर संशय पत्रकार परिषदेत व्यक्त करण्यात आला
राजकीय षडयंत्राचा आरोप
या संपूर्ण प्रकरणावर प्रतिक्रिया देताना उमेदवार फारुख इनामदार यांनी थेट आरोप केला आहे की,
“निवडणुकीच्या काळात माझे राजकीय आयुष्य जाणीवपूर्वक उद्ध्वस्त करण्याच्या हेतूने मला खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. काँग्रेसचे प्रशांत जगताप यामागे असल्याचा मला ठाम संशय आहे.”
या प्रकरणामुळे पुणे महापालिका निवडणुकांच्या राजकारणात खळबळ उडाली असून, आता या ऑडिओ क्लिपची सखोल चौकशी होणार का? खरे सूत्रधार कोण? याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!