डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं पोस्टर फाडलं गेलं, यामुळे राज्यभरातून आव्हाडांवर टीका
ठाणे प्रतिनिधी :- सरकारने शालेय अभ्यासक्रमामध्ये मनुस्मृतीमधील दोन श्लोकांचा समावेश करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचा राज्यभरातून विरोध केला जात आहे. याच पार्श्वभूमीवर शरद पवार गटाचे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनी महाडमधील चवदार तळ्याच्या ठिकाणी जात मनुस्मृती दहन करत निषेध नोंदवला..
Advertisement
जाहीर निषेध !जाहीर निषेध! स्टंटबाजीच्या नादात जितेंद्र आव्हाड यांनी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे फोटो फाडलेत. स्टंटबाजीत आपण काय मूर्खपणा केला हेही आव्हाडांच्या लक्षात येऊ नये आंबेडकर प्रेमी म्हणून या घटनेचा तीव्र भावना उमटल्या
प्रसंगी जितेंद्र आव्हाड यांनी सोशल मीडिया पोस्ट करून माफी मागितली



