पुणे अपघात प्रकरणी धनिकांच्या मुलाला वाचवण्यासाठी ससून हॉस्पिल प्रशासन ही आघाडीवर …


 पुणे प्रतिनिधी :- पुणे अपघात प्रकरणात धनिक पुत्राला वाचवण्यासाठी ससून रुग्णालयातील डॉक्टरांनी गैरकृत्य केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

पुणे अपघात प्रकरणात धनिक पुत्राला वाचवण्यासाठी ससून रुग्णालयातील डॉक्टरांनी गैरकृत्य केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नमुन्यांची अदलाबदल केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी डॉ. अजय तावरे आणि डॉ. श्रीहरी हळनोर यांना अटक करण्यात आली आहे. अग्रवाल कुटुंबीयांच्या नातेवाईकांनी या दोघांना पैशांचे आमिष दाखवले. विशाल अग्रवाल याने अजय तावरे यांना फोन केल्याची माहिती कॉल डिटेल्समधून समोर आली आहे. त्यानंतर या दोघांनीही अल्पवयीन मुलगा अल्कोहोल टेस्टमध्ये निर्दोष ठरावा, यासाठी त्याच्या रक्ताच्या नमुन्यांऐवजी एका दुसऱ्याच रुग्णाच्या रक्ताचे सॅम्पल्स फॉरेन्सिक लॅबकडे दिले. पुणे पोलिसांनी या दोघांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी सुरु केली आहे. या चौकशीतून आणखी काय निष्पन्न होणार, हे पाहावे लागेल.

Advertisement

या दोघांनाही आता सोमवारी दुपारी शिवाजीनगर न्यायालयात हजर केले जाईल.
पुणे अपघात प्रकरणी अल्पवयीन आरोपीच्या ब्लड रिपोर्टमध्ये फेरफार केल्याच्या आरोपाखाली पोलिसांनी दोन डॉक्टरांवर कारवाई केली आहे. ससुनचे डॉ. अजय तावरे व डॉ. श्रीहरी हरलोर यांचा यामध्ये समावेश आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!