दिल्ली विधानसभा निवडणुक निकाला आधी राजकीय खळबळ ACB चे पथक अरविंद केजरीवाल यांच्या घरी धडक..


दिल्ली प्रतिनिधी :- दिल्लीचे माजी मुख्यमंत्री व आम आदमी पार्टीचे नेते अरविंद केजरीवाल यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या काही तास आधी एसीबीच्या पथकाने अरविंद केजरीवाल यांच्या घरी धाड मारली…
दिल्लीत मतदान झाल्यानंतर आलेल्या एक्झिट पोलमध्ये भाजपची सत्ता येणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यानंतर केजरीवालांनी सोशल मीडियात एक पोस्ट करत भाजपवर गंभीर आरोप केला. आपच्या 16 उमेदवारांना भाजपने मंत्रिपद आणि पक्ष बदलण्यासाठी 15-15 कोटी रुपये देण्याचा प्रयत्न मिळाल्याचा आरोप केजरीवालांनी केला आहे.केजरीवालांच्या या आरोपांनंतर भाजपने आज थेट नायब तहसीलदारांना पत्र लिहून केजरीवालांच्या आरोपांची चौकशी करण्याची मागणी केली. केजरीवालांचे आरोप निराधार असून भाजपची प्रतिमा खराब करणारे आहेत. दिल्लीत दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने हे आरोप केल्याचे भाजपने पत्रात म्हटले आहे.

भाजपच्या या पत्रानंतर नायब राज्यपालांच्या प्रमुख सचिवांनी थेट एसीबीला या आरोपांची चौकशी करण्याचे आदेश दिले. त्यानंतर लगेचच एसीबीची टीम केजरीवालांसह आपचे खासदार संजय सिंह यांच्या घरी पोहचली आहे. तर संजय सिंह यांनीही थेट एसीबीचे कार्यालय गाठले आहे. त्यामुळे सध्या दिल्लीती राजकीय वातावरण चांगलेच तापले आहेकेजरीवालांनी केलेल्या आरोपांमुळे एसीबीकडून आपच्या अनेक नेत्यांची चौकशी होण्याची शक्यता आहे. उमेदवारांचीही झाडाझडती एसीबीकडून घेतली जाऊ शकते. त्यामुळे निकालाच्या काही तास आधीच दिल्लीत आपच्या उमेदवारांना चौकशीला सामोरे जावे लागेल. एसीबीच्या चौकशीतून काय निष्पन्न होणार, हे लवकरच समजेल…


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!