भारतीय शेअर बाजार धक्कादायक रित्या गडगडला, गुंतवणूकदारांचे 10.24 लाख कोटी रुपये पाण्यात जाण्याची शक्यता…


पुणे प्रतिनिधी :- मिलिंद राजहंस

भारतीय शेअर बाजारात अभूतपूर्व घसरण…
भारतीय शेअर बाजार सोमवारी (5 ऑगस्ट) घसरणीसह उघडले. जागतिक बाजारात जोरदार विक्री दिसून येत आहे. निफ्टी आणि अमेरिकन फ्युचर्स मार्केटसह आशियाई बाजारांमध्ये मोठी घसरण दिसून येत आहे.
निफ्टी 430 हून अधिक अंकांची मोठी घसरण झाली.

गुंतवणूकदारांचे 10.24 लाख कोटी रुपये पाण्यात

अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेतील मंदीच्या भीतीने जागतिक बाजार कोसळला. सेन्सेक्स आणि निफ्टी आज सलग दुसऱ्या सत्रात घसरले. गुंतवणूकदारांची संपत्ती 10.24 लाख कोटी रुपयांनी घसरली.

शेअर बाजाराचे मार्केट कॅप 446.92 लाख कोटी रुपयांवर आले आहे. मागील सत्रात मार्केट कॅप 457.16 लाख कोटी रुपये होते. सुरुवातीच्या व्यवहारात
व्यवहारात निफ्टी 24,238 वर आणि सेन्सेक्स 1563 अंकांनी घसरून 79,419 वर आला.

सेन्सेक्सचे सर्व शेअर्स लाल

Advertisement

सेन्सेक्सवर 30 शेअर्स लिस्ट आहेत, त्यापैकी एकही ग्रीन झोनमध्ये नाही. सर्वात मोठी घसरण मारुती, टाटा मोटर्स आणि टायटनमध्ये झाली आहे. आज BSE वर 3065 शेअर्सचे व्यवहार होत आहेत. यामध्ये 465 शेअर्स तेजीत दिसत आहेत, 2435शेअर्समध्ये घसरण दिसून येत आहे आणि 165 शेअर्समध्ये कोणताही बदल दिसून येत नाही.

याशिवाय 65 शेअर्स एका वर्षाच्या उच्चांकावर तर 25 शेअर्स एका वर्षाच्या नीचांकी पातळीवर आले. 77 शेअर्स वरच्या सर्किटवर पोहोचले, तर 116 शेअर्स लोअर सर्किटवर पोहोचले.

इराण आणि इस्रायलमधील तणावाने जगभरातील बाजारपेठा हादरल्या. देशांतर्गत शेअर बाजाराची स्थितीही चांगली नाही आणि इक्विटी बेंचमार्क निर्देशांक सेन्सेक्स आणि निफ्टी झपाट्याने घसरले. निफ्टीच्या सर्व क्षेत्रांचे निर्देशांक लाल आहेत. मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्समध्येही विक्रीचा दबाव आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!