शेअर ट्रेडिंग मध्ये जास्तीच्या परतावा देण्याचे आमिष दाखवून २६२ नागरिकांची २६,४१,४०,००० रुपये ची फसवणूक..
पुणे प्रतिनिधी :- मिलिंद राजहंस
पुणे शहरात विविध पोलीस स्टेशन अंतर्गत शेअर ट्रेडिंग मधे गुंतवणूक करण्यास भाग पडून फसवणुकीच्या मोठ्या प्रमाणात घटना घडत आहेत असे असताना मुंडवा पोलीस स्टेशन अंतर्गत 5% जादा परतव्याचे अमिश दाखवून तब्ब्ल 26 कोटी 41 लाख 40 हजार रुपये ची फसवणूक केली
मुंढवा पोलीस ठाणे, पुणे शहर येथे तक्रारदार यांनी प्रथम बी.टी कवडे रोड सॅफरोन हॉटेल बिल्डींगच्या पाचव्या मजल्यावर एस. जी ट्रेडर्स या कंपनीचे मालक सुरेश आण्णाप्पा गाडीवष्डार व इतर यांनी गुंतवणुक रक्कमेवर महिन्याला ०५ टक्के परतावा देतो असे अमिष दाखवून ३१,००,०००/- रुपये गुंतवणुक करण्यास भाग पाडले, गुंतवणुक रक्कम तसेच रक्कम परतावा न दिल्याने अर्जदार यांची तक्रार प्राप्त झाली.
सदर तक्रारीचे गांभीर्य लक्षात घेता तात्काळ चौकशी चालू केली असता चौकशी कालावधीमध्ये सदर प्रकरणी मोठया प्रमाणात तक्रारी प्राप्त झाल्या. तक्रारी अर्ज चौकशीअंती एस.जी. ट्रेडर्स, शेअर ट्रेडींग कंपनीचे मालक सुरेश गाडीवड्डार, सुभाष गाडीवड्डार, शुभांगी मोहिते, निकिता, किरण दलाल, सौरभ, गंगाधर यांनी माहे जानेवारी २०२० ते माहे मे २०२४ या कालवधीमध्ये लोकांचे विश्वास संपादन करुन, त्याचे कंपनी मध्ये पैसे गुंतविण्यास भाग पाडुन, परताव्याचे आमिष दाखवून, त्यांचे गुंतवणुकीवर कोणत्याही प्रकारचे परतावा न देता तसेच गुंतवणुक केलेले पैसे परत न करता, एकुण २६२ लोकांची सुमारे २६,४१,४०,०००/- रुपयांची आर्थिक फसवणुक केली असल्याचे निष्पन्न झाले. तसेच अद्यापही लोकांकडून तक्रारी प्राप्त होत असल्याने फसवणुक रक्कमेत आणखीन वाढ होणार आहे.
प्रस्तुत प्रकरणी मुंढवा पोलीस ठाणे गुन्हा रजि. नंबर ३२५/२०२४, भा.दं. वि. कलम ४०६, ४२०, ३४, महाराष्ट्र ठेवीदारांच्या (वित्तीय संस्थेमधील) हित संबधांचे सरंक्षण अधिनियम १९९९ चे कलम ३, ४ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. दाखल गुन्हयाचा. वरिष्ठांचे सुचना प्रमाणे पुढील तपास पोलीस निरीक्षक (गुन्हे), श्री. बाबासाहेव निकम मुंढवा पोलीस ठाणे, पुणे शहर हे करीत आहेत.



