पुणे शहरात सहायक पोलीस निरीक्षक यांच्यावर खुनी हल्ला करणारे नामचिम गुन्हेगारांना १२ तासांचे आत केले जेरबंद…
पुणे प्रतिनिधी :- मिलिंद राजहंस
पुणे शहरात पोलिसांवर हल्ला झाल्या मुळे गुंडाना पोलिसांचा धाक राहिला नसल्याच्या प्रतिक्रिया सर्व स्तरातून उमटल्या पोलीस अधिकाऱयांवर कोयत्याने हल्ला करण्या पर्यंत गुंडांची मजल गेली पुणे शहरात गुंडाचे राज्य आहे का पोलिसांचे या बाबत प्रश्न उपस्तित होतो. परिमंडळ-५, पुणे शहर, व श्री निखिल पिंगळे, पोलीस उप आयुक्त, गुन्हे पुणे शहर यांनी दाखल गंभीर गुन्हयाचा संमातर तपास करुन आरोपीतांना ताब्यात घेणेबाबत आदेश दिले होते.
दिनांक २५/०८/२०२४ रोजी सय्यदनगर बंद रेल्वे गेटजवळ दोन दुचाकी चालकांचा वाद सोडवण्यासाठी गेलेल्या सहायक पोलीस निरीक्षक रत्नाकर गायकवाड यांचेवर निहाल सिंग मन्नु सिंग टाक व राहुल सिंग रविंद्रसिंग भोंड यांनी खुनी हल्ला करुन दहशत करुन पळुन गेले आहेत म्हणुन त्यांचे विरुध्द वानवडी पोलीस ठाणे गु. र. नं. ४७३/२०२४ भा. न्या. संहिता २०२३ चे कलम १३२,१०९,११५(२), ३५२, ३५१(२), ३(५) सह आर्म अक्ट कलम ४(२५) महा. पो. अधि. कलम ३७(१) (३) सह १३५ क्रिमिनल लॉ अमेंडमेट अॅक्ट ३ व ७ प्रमाणे गुन्हा दाखल झालेला आहे. सदरचा गुन्हा केल्या पासुन, त्यातील आरोपी निहाल सिंग मन्नुसिंग टाक व राहुल सिंग रविंद्रसिंग भोंड हे पळुन गेलेले होते.
श्री. शैलेश बलकवडे, अप्पर पोलीस आयुक्त गुन्हे, पुणे शहर, व श्री आर राजा, पोलीस उप आयुक्त,
परिमंडळ-५, पुणे शहर, व श्री निखिल पिंगळे, पोलीस उप आयुक्त, गुन्हे पुणे शहर यांनी दाखल गंभीर गुन्हयाचा संमातर तपास करुन आरोपीतांना ताब्यात घेणेबाबत आदेश दिले. प्राप्त आदेशान्वये वरिष्ठ पोलीस निरीक्षक, अजय वाघमारे, युनिट ४ यांनी युनिट-४ कडील पोलीस उपनिरीक्षक, वैभव मगदुम व पोलीस स्टाफ व युनिट ५ कडील सहा. पोलीस निरीक्षक कृष्णा बाबर व पोलीस स्टाफ असे पथक तयार केले. तपास पथकाने दाखल गुन्हयातील पाहिजे आरोपीतांचा ठाव ठिकाण्याबाबत कसोशिने तपास करीत असताना पोलीस हवालदार अजय गायकवाड, युनिट-४ यांना त्यांचे बातमीदाराने गुन्ह्यातील पाहिजे आरोपी निहाल सिंग व राहुल सिंग हे ट्रॅव्हल्स बसमधुन सोलापुरकडे पळुन जात आहेत आशी माहिती दिली. प्राप्त बातमी वरिष्ठांना कळविण्यात आली असता मा. पोलीस उप आयुक्त गुन्हे, पुणे शहर यांनी बातमीचे अनुषंगाने पुणे सोलापुर हायवेवरती नाकाबंदी करणेबाबत सोलापुर ग्रामीण पोलीसांना कळविले. त्याप्रमाणे टेंभुर्णी पोलीस ठाणेकडील पोलीस निरीक्षक, गावडे व पोलीस स्टाफ यांनी नाकाबंदी सुरु केली. नाकाबंदीचे ठिकाणी युनिट-४ व युनिट-५ कडील अधिकारी व पोलीस स्टाफ तेथे पोहोचले. त्यानंतर आरोपी प्रवास करीत असलेली बस नाकाबंदीचे ठिकाणी आली. बस अडवुन त्यातील आरोपी निहाल सिंग मन्नु सिंग टाक व राहुल सिंग रविंद्रसिंग भोंड दोघे रा. कॅनल रोड हडपसर पुणे यांना पकडुन जेरबंद केले. त्यांचेकडे प्राथामिक तपास करुन त्यांना पुणे येथे आणुन वानवडी पालीस स्टेशन यांचे ताब्यात दिले आहे.
सदरची उल्लेखनिय कामगिरी मा. पोलीस आयुक्त श्री. अमितेशकुमार, मा. पोलीस सह आयुक्त श्री. रंजनकुमार शर्मा, मा. अपर पोलीस आयुक्त गुन्हे, श्री शैलेश बलकवडे, गा. पोलीस उप आयुक्त गुन्हे श्री. निखिल पिंगळे, मा. सहायक पोलीस आयुक्त गुन्हे-१ श्री. गणेश इंगळे, मा. सहायक पोलीस आयुक्त गुन्हे-२ श्री. सतिश गोवेकर, युनिट-४ कडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. अजय वाघमारे, पोलीस उपनिरीक्षक श्री वैभव मगदुम, पोलीस अंमलदार अजय गायकवाड, हरिष मोरे, प्रविण भालचिम, संजय आढारी, विनोद महाजन, जंहागीर पठाण, राहुल परदेशी, विशाल गाडे, व युनिट-५ कडील सहा. पोलीस निरीक्षक, कृष्णा बाबर व टेंभुर्णी पोलीस ठाणे कडील पोलीस निरीक्षक, गावडे व पोलीस स्टाफ यांनी केली आहे. तसेच सदर गुन्हयाचा संमातर तपास वानवडी पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पतंगे व त्यांचे पथकाने केली.



