रास्त भाव धान्य दुकानदारांनी 4G E-Pos मशीनची काढली अंतयात्रा…
पुणे प्रतिनिधी :- मिलिंद राजहंस
शासनामार्फत नव्याने दिलेल्या 4G E-Pos मशीन सदोष असल्याने या E-Pos मशीनवर धान्य वितरण करताना अनेक तांत्रिक समस्या उद्भवत आहेत. तसेच सातत्याने होणारे सर्वर डाऊन यामुळे देखील राज्याचे धान्य वितरण प्रलंबित रहात आहे.
या समस्यांकडे राज्य शासनाचे लक्ष वेधण्यासाठी ‘अखिल महाराष्ट्र राज्य स्वस्त धान्य दुकानदार व केरोसीन परवानाधारक महासंघ, पुणे’ कडून FDO कार्यालया समोर आंदोलन करत E-Pos मशीन शासनाकडे परत करण्यात आले. राज्य संघटनेचे सर्व पदाधिकारी, सर्व जिल्हाध्यक्ष, सर्व तालुकाध्यक्ष आणि कार्यकारिणी सदस्य उपस्तितीत होते
सातत्याने होणाऱ्या सर्वर डाऊन मुळे जुलै, 24 महिन्याचे धान्य वितरण पूर्ण करण्याबाबत राज्य शासनाने दिनांक 30 जुलै, 2024 रोजी ऑफलाइन धान्य वितरणाची केलेली घोषणा ही पूर्णतः फसवी आहे. याचे कारण की, सुमारे 30 ते 40 वर्ष सेवा देणाऱ्या रास्त भाव दुकानदारांवर थोडाही विश्वास न ठेवता शासकीय कर्मचारी म्हणून कोतवालांच्या उपस्थितीत धान्य वितरण करण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत. वास्तविक पाहता राष्ट्रीय ‘अन्नसुरक्षा अधिनियम, 2013’ नुसार सार्वजनिक वितरण प्रणालीमध्ये रास्त भाव दुकानांचे योग्य प्रकारे कार्यान्वयन ही सर्वस्वी राज्य शासनाची जबाबदारी असल्याने रास्त भाव दुकानदारांना योग्य त्या सुविधा देणं तसेच धान्य वितरणामध्ये येणाऱ्या दैनंदिन आडीअडचणी व समस्यांची सोडवणूक करणे ही राज्य शासनाचे नैतिक कर्तव्य आहे.असे संघटनेचे अध्यक्ष गणेश डांगी यांनी सांगितले.
प्रभारी अन्नधान्य वितरण अधिकारी प्रशांत खताळ यांनी सांगितले की दुकानदाराच्या मागण्या या राज्यस्तरीय असून त्यांनी दिलेली निवेदन हे राज्य सरकारला पाठण्यात येईल



