कात्रज गुजरवाडी परिसरात अनधिकृत गौणखनिज खोदाई मंडल अधिकाऱ्यांन कडून तुटपुंजी कारवाई…


पुणे प्रतिनिधी :- मिलिंद राजहंस

पुणे शहरात जिल्ह्यात भू माफिया कडून डोंगर फोड करून मोठ्या प्रमाणात अनधिकृत खोदाई करण्यात येत आहे. पुणे जिल्ह्यातील जिल्हाधिकारी, तहसीलदार,मंडल अधिकारी, यांच्या काडून जिल्ह्यातील भू माफियांना अभय देऊन तुटपुंजी कारवाईचा दिखावा करण्यात येत असल्याने परिसरातील डोंगर टेकडया भुई सपाट होत आहेत मा जिल्हाधिकारी अश्या अधिकाऱयांवर कारवाई करणार का ?

पुणे उपनगरात कात्रज गुजरवाडी रोड, निसर्ग रेसिडेन्सी, कात्रज गाव येथे बेकायदेशीर रित्या डोंगर फोड सुरू असल्याची तक्रार परिसरातील नागरिकांनी दिली असता संबंधित मंडल अधिकारी यांनी कायदेशीर रित्या कारवाई कारणे गरजेचे असताना अधिकाऱयांनी 1200 ते 2000 स्क्वेअर मीटर खोदाई दिसत असताना फक्त 300 स्क्वेअर मीटर खोदाई केली आहे दाखवले तसेच कायद्या नुसार JCB मशीन, गौण खनिज वाहतूक ट्रक,व इतर साहित्य जप्त केले नाही.

Advertisement

परिसरातील जवळ जवळ संपूर्ण डोंगर फोडण्यात आला आहे, अजूनही हे काम चालूच आहे, तरी बेकायदेशीर डोंगर फोड तसेच उत्खनन करणाऱ्या संबंधित जागा मालक तसेच ठेकदार यांच्या वर कायदेशीर कारवाई करून हे उत्खनन करणारी वाहने व साहित्य जमा करून घेण्यात यावी तसेच हे अनधिकृत काम सुरू असताना त्याकडे हेतुपुरस्पर दुर्लक्ष करणाऱ्या तलाठी, मंडल अधिकारी व ईतर संबंधितावर कायदेशीर कारवाई करण्या बाबत ची मागणी सामाजिक कार्यकर्ते सतीश तावरे यांनी केली..


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!