पुणे जिल्ह्याचे माजी जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांची पुणे महानगरपालिका आयुक्तपदी नियुक्ती…


पुणे प्रतिनिधी :- मिलिंद राजहंस

स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकी संदर्भात गेल्या आठवड्यात सर्वोच्च न्यायालयाने निकालात चार महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घ्याव्यात असे आदेश दिले असता 8 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. राज्यात महायुतीचे सरकार पुन्हा आल्यापासून सातत्याने प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या सुरू आहेत. राज्य सरकार प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्याचे सत्र दर महिन्यातून दोनदा किंवा तिनदा करताना दिसत आहे. त्यात पुणे शहरासाठी आयुक्त पदी पुणे जिल्ह्याचे माजी जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांची नियुक्ती करण्यात आली…

पुणे शहराचे माजी आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले निवृत्त झाल्यानंतर पुण्याला नवीन आयुक्त मिळाले आहेत. नवल किशोर राम यांनी पुण्याचे जिल्हाधिकारी म्हणूनही धुरा सांभाळली आहे. पुणे महापालिकेचे नवीन आयुक्त नवल किशोर राम असणार आहेत. नवल किशोर राम हे २००७ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. ते मूळ बिहारमधील चंपारण्य जिल्ह्यातील मोतीहारी गावचे आहेत. सन 2007 मध्ये ते आपीएस झाले आणि पुढे त्यांची आयएएसमध्ये निवड झाली. नवल किशोर राम यांची  पहिली नियुक्ती नांदेड येथे झाली होती. त्यानंतर त्यांनी यवतमाळ जिल्हा परिषदेत दोन वर्षे काम केले.बीड आणि तेव्हाचे औरंदबाद येथे जिल्हाधिकारी म्हणून देखील त्यांनी काम पाहिलं आहे. २०२० मध्ये नवल किशोर राम हे पुण्याचे जिल्हाधिकारी होते. कोरोना संकाटाच्या काळात त्यांनी स्वतः गावोगावी जाऊन भेटी दिल्या होत्या. देशभरातील सर्वोत्तम जिल्हाधिकारी म्हणून देखील त्यांना सन्मानित करण्यात आलं. पुण्यातून त्यांची थेट पंतप्रधान कार्यालयात उपसचिवपदी नियुक्ती करण्यात आली होती.

Advertisement

राज्यातील 8 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. सौरभ कटियार यांची मुंबई उपनगर जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती, तर नवल किशोर राम यांची पुणे महानगरपालिका आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!