दे..ग.. माये… दे.. ग…माये… आरोळी करून… CCTV साठी अमोल परदेशी यांचे भीक मागो आंदोलन


पुणे प्रतिनिधी :- मिलिंद राजहंस

बिबवेवाडी पोलीस स्टेशन हद्दीत अप्पर इंदिरानगर शिवतेज नगर, 276 ओटा, सुप्पर या परिसरामध्ये गुन्हेगारी टोळ्या माठ्या प्रमाणत गांजा सारखे अमली पदार्थ पिऊन रस्त्यावरील गाड्या फोडण्याचे प्रकार अनेक वेळा घडले आहेत. असे असताना या आठवड्यात परिसरात कोयता गॅंगने हैदोस घातला त्याचबरोबर गोळीबार झाला या सर्व गोष्टी लक्षात घेता. प्रभागांमध्ये सीसीटीव्ही बसवणे अत्यंत महत्त्वाचा आहे. महानगरपालिकेला सीसीटीव्ही बद्दल अनेक वेळा पत्र व्यवहार केला असता देखील महानगरपालिका याच्याकडे फंड नाही म्हणून दुर्लक्ष करीत आहे. तसेच बिबवेवाडी पोलीस स्टेशन, पोलीस आयुक्त कार्यालयला ही मागणी करून सीसीटीव्ही बाबत कोणतीही कारवाई होत नाही.अशी कारणे दिल्याने राष्ट्रवादी काँग्रेस अर्बन सेल चे पार्वती विधानसभा अध्यक्ष मा अमोल परदेशी यांनी दे.. ग.. माय एक रुपया दे.. ग… माय आमच्या भागात CCTV बसवण्यासाठी शासनाकडे पैसे नाहीत…अशी आरोळी देऊन ठीक ठिकाणी भीक मागितली…

Advertisement

पुणे महानगरपालिकेच्या नगरसेवक पदाच्या निवडणुका गेली 5 वर्षा पासून झाल्या नसल्याने प्रशासक म्हणून महा पालिका आयुक्त सर्व काम पाहत असताना CCTV सारख्या संवेदनशील प्रश्नाला आमच्याकडे ही फंड नाहीये म्हणून आज अप्पर इंदिरानगर मधील अनेक नागरिकांकडून भीक मागून निधी जमा केला.

तसेच पर्वती मतदारसंघाच्या आमदार मंत्री माननीय.माधुरीताई मिसाळ यांच्या जनसंपर्क कार्यालयात जाऊन अप्पर इंदिरानगर मध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यासाठी भीक मागायला गेलो असता पोलिसांनी अडवणूक केली व आमदारांना भेटून दिले नाही.

बिबवेवाडी पोलीस स्टेशन हद्दीत पुरेसे सीसीटीव्ही आढळून येत नसल्या कारणाने पोलिसांना योग्य गुन्हेगार पर्यंत पोचता येत नसून गुन्ह्यांची उकल करण्यात अडचणी येत आहेत.पुणे महानगरपालिका जर फंड नसल्याचे कारण देत असल्याने परिसरातील वाढती गुन्हेगारी रोखणार कोण?
अप्पर इंदिरानगर झाला गुन्हेगारांचा अड्डा. झाला असल्याने
सदर भीक मागून जमा केलेले पैसे बिबवेवाडी क्षेत्रीय कार्यालय येथे जमा करणार आहे.असे राष्ट्रवादी काँग्रेस अर्बन सेल चे पार्वती विधानसभा अध्यक्ष मा अमोल परदेशी यांनी सांगितले….

 


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!