बिबवेवाडी पोलिसांनी गोळीबार केलेल्या आरोपींची धिंड काडून भयभीत झालेल्या नागरिकांना दिलासा…


पुणे प्रतिनिधी :- मिलिंद राजहंस

बिबवेवाडी पोलीस स्टेशन हद्दीत अप्पर इंदिरानगर शिवतेज नगर, 276 ओटा, सुप्पर या परिसरामध्ये गुन्हेगारी टोळ्या माठ्या प्रमाणत गांजा सारखे अमली पदार्थ, दारू पिऊन रस्त्यावरील गाड्या फोडण्याचे प्रकार अनेक वेळा घडले आहेत. असे असताना या आठवड्यात परिसरात कोयता गॅंगने हैदोस घातला. काही गुन्हेगार चक्क पिस्तूल काडून गोळीबार ही झाला असे असताना परिसरातील नागरिक भयभीत होऊन पोलिसांचा धाक राहिला नसल्याने असे प्रकार होत असल्याचे परिसरात चर्चा होती. आरोपीतांना बिबवेवाडी पोलिसांनी केली २४ तासात अटक करून आरोपींची दिंड काढली व नागरिकांना दिलासा दिला.
वरिष्ठ पोलीस अधिकारी मा. शंकर साळुंखे साहेब यांनी अश्या प्रकारे कोणी गुन्हेगारी कृत्य केल्यास त्यांना पोलिसी खाक्या दाखवण्यात येईल असे सांगितले…

सदरबाबत अधिक माहिती अशी की, “दिनांक १८/०५/२०२५ रोजी ०२.१५ वा. ते ०२.३० वा. सुमारास डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानाचे मागे हनुमान मित्र मंडळ चौकामध्ये अप्पर बिबवेवाडी पुणे. येथे फिर्यादी यांचे दाजी उमेश जालिंदर शिंदे व गणेश सुर्यवंशी यांनी अक्षय भालके याचेविरुध्द डायल ११२ वय पोलीसांना केलेल्या तक्रारीचा राग मनात धरून इसम बाळा गाडे, सनी शिंदे, बाब्या पंधेकर, गणेश भालके, बंटी म्हस्के व देवा डोलारे यांनी मिळून फिर्यादी यांना धारदार शस्त्राचा धाक दाखवून लाथाबुक्यांनी व काठीने मारहाण केली तसेच बाळा गाडे याने त्याचेकडील पिस्टलने फिर्यादी यांचे दिशेने फायर करून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला म्हणून फिर्यादी यांनी बाळा गाडे, सनी शिंदे, बाब्या पंधेकर, गणेश भालके, बंटी म्हस्के, अक्षय भालके व देवा डोलारे यांचेविरूध्द दिली.

Advertisement

बिबवेवाडी पोलीस स्टेशन गुन्हा रजि.नं. १०९/२०२५ भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १०९,११५(२), १८९(२), १८९(४), १९१(२), १९१ (३), १९०, आर्म अॅक्ट ३(२५),४ (२५), महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१) (३) सह १३५ अन्वये गुन्हा दाखल आहे.”

दाखल गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेणे साठी . वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर साळुंखे साो. व मा.पोलीस निरीक्षक सुरज बेंद्रे साो (गुन्हे) यांनी दाखल गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेणेबाबत तपास पथकाचे प्रभारी पोउनिरी अशोक येवले व अंमलदार यांना सुचना केले.

सदर आरोपी हे अप्पर इंदिरानगर चैत्रबन परिसरातील आहेत. गुन्ह्यातील आरोपी रेकॉर्डवरील व चलाख वृत्तीचे गुन्हेगार असल्याने ते पोलीसांचे डावपेच ओळखून होते. आरोपींचा शोध घेत असताना पोलीस अंमलदार प्रणय पाटील, सुमित ताकपेरे, ज्योतिष काळे, विशाल जाधव यांना त्यांचे बातमिदारामार्फत बातमी मिळाली की, सनी शिंदे, बाब्या पंधेकर, बंटी म्हस्के, अक्षय भालके, गणेश भालके हे चैत्रबन वसाहत येथे एका पडक्या घरामध्ये लपून बसलेबाबत खात्रिशिर बातमी मिळाली. त्यानुसार तपास पथकाने घेरा घालून त्यांना ताब्यात घेतले. तसेच गुन्हे शाखा युनिट ६ चे सहा. पोलीस निरीक्षक मदन कांबळे, व त्यांचे स्टाफ यांनी देवा डोलारे यास बोपदेव घाट येथून ताब्यात घेवून अटक केली असून पुढील तपास करत आहोत.

सदरची कामगिरी मा. पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सह पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अप्पर पोलीस आयुक्त मनोज पाटील पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ५ राजकुमार शिंदे, सहा. पोलीस आयुक्त, वानवडी विभाग धन्यकुमार गोडसे, यांचे मार्गदर्शनाखाली मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर साळुंखे साो. व मा.पोलीस निरीक्षक सुरज बेंद्रे साो (गुन्हे), पोउनिरी अशोक येवले, पो.हवा. गायकवाड, पो.अं. प्रणय पाटील, सुमित ताकपेरे, ज्योतिष काळे, विशाल जाधव, रक्षित काळे, दत्ता शेंद्रे, आशिष गायकवाड यांनी केली आहे.

 


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!