पंचशील सेवा संघ, सुपर इंदिरानगर येथील बुद्ध विहारात पांढऱ्या शुभ्र बुद्ध रूपाची प्रतिष्ठापना….


पुणे प्रतिनिधी :- मिलिंद राजहंस

पुणे बिबवेवाडी सुप्पर परिसरातील पंचशील सेवा संघ बुद्ध विहारात पुणे विद्यापीठ येथील पाली भाषा अध्यासन विभागातील व्हिएतनामी स्टूडेंट संघाने दान स्वरूपात दिलेल्या बुद्ध रूपाची प्रतिस्थापना करण्यात आली. सदर कार्यकर्मास परिसरातील असंख्य बुद्ध उपासक व उपासिका उपस्तिथ होते.

कार्यक्रमाला डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या (२७६) येथील उद्यानातील पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून पांढऱ्या शुभ्र मुर्तीची मिरवणुकीने सुरुवात झाली.
12 व्हिएतनामी स्टूडेंट भिक्षु चिवर परिधान करून मिरवणुकीत सहभागी झाले होते तसेच परिसरातील उपासक व उपासकीका पांढरे शुभ्र वस्त्र व पंचशील ध्वज घेऊन सहभागी झाले
आकर्षक पांढऱ्या शुभ्र बुद्ध रूपाची स्थापना व्हिएतनामी
१२ (चिवरधारी) भन्तेंच्या हस्ते बुद्ध रूपाची प्रतिष्ठापना करण्यात आली. सर्व प्रथम उपस्थीतांना भंते फाम- फु थानह यांनी त्रीसरण आणि पंचशील देऊन. धम्मदेसना दिली. आदरणीय भिक्षु व भिक्षुनी संघाचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला आयुनि.लक्ष्मीकांता माने मॅडम आयुनि.वैशाली सोनवणे यांचे विशेष सहकार्य लाभले पंचशील सेवा संघाचे आजी माजी पदाधिकारी यांनी हजेरी लावली होती. तसेच उपस्तिथ नागरिकांना खीर दान व
फलआहार देण्यात आला परिसरातील माजी नगरसेवक बाळासाहेब ओसवाल, समाज सेवक दिनेश उर्फ पिंटूभाऊ धावडे, भीमराव साठे उपस्तिथ होते तसेच पाली भाषेचे अभ्यासक प्रध्यापक धर्मा गरड, रवींद्र गायकवाड, मिलिंद राजहंस, बाबुराव घाडगे, पंचशील सेवा संघाचे अध्यक्ष आयु.सतिश जानराव, सेक्रेटरी आयु.अनिल ओहाळ ‌आणि खजिनदार लक्ष्मण (बाळु) गायकवाड यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन सुरेश ओव्हाळ यांनी केले सदर कार्यक्रमास परिसरातील बहुसंख्य बौद्ध उपासक व उपासिका उपस्थित होते.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!