गुंडगिरीचे साम्राज्य मोडीत! कुख्यात गुंड टिपु पठाणचे अनधिकृत ऑफिस जमीनदोस्त
पुणे प्रतिनिधी :- मिलिंद राजहंस
पुणे शहरातील अंडरवर्ल्ड व अतिक्रमणाविरुद्ध पोलिस आणि पुणे महानगरपालिका यांची धडाकेबाज मोहीम सुरू असून आज पुन्हा एकदा गुंडगिरीचे साम्राज्य मोडीत काढण्यात आले आहे. हडपसरच्या सय्यदनगर भागातील कुख्यात गुंड रिझवान ऊर्फ टिपु सत्तार पठाण याचे बेकायदेशीर ऑफिस, टपरी व अतिक्रमण संयुक्त कारवाईत उद्ध्वस्त करण्यात आले.
कुख्यात टिपु पठाण याच्यावर काळेपडळ पोलिस ठाण्यात गु.र.नं. १००/२०२५ भा.न्या.स. कलम ३०८(२), ३२९(३), ३५१(२), ३५२, १८९(१), १८९(२), १९१(२) तसेच महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मोक्का) कलम ३(१)(II), ३(२), ३(४), २३(१) अंतर्गत गुन्हा दाखल असून त्यास पोलिसांनी अटकही केली आहे.

पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार सय्यदनगर येथील ख्वाजा मंजिल इमारतीवर टिपु पठाणने डामडौल करण्यासाठी बेकायदेशीर ऑफिस व अतिक्रमण उभारले होते. मात्र आज दिनांक २६ सप्टेंबर २०२५ रोजी काळेपडळ पोलीस व पुणे महानगरपालिका अतिक्रमण विभागाच्या संयुक्त चमूने ही संपूर्ण बांधकामे जमीनदोस्त केली.
अलीकडे आंदेकर याचे अनधिकृत बांधकाम पाडल्यानंतर ही सलग दुसरी मोठी कारवाई असून, नागरिकांमध्ये आनंद व्यक्त होत आहे. पुण्यातील वाढती गुंडगिरी मोडण्यासाठी पोलिस व महापालिका आता आक्रमक पवित्र्यात उतरल्याचे स्पष्ट झाले आहे.




https://shorturl.fm/tyf4M